30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeक्राईमनाशिक एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांला अटक

नाशिक एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांला अटक

एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी इंस्टाग्राम च्या मदतीने २४ तासाच्या आत ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 17 ) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास म्हाडा वसाहतीत बुद्ध विहारालगत राहणारे फिर्यादी किरण कुमावत यांना त्याच परिसरात राहणारे संशयित सागर सोनार याने जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्या साथीदारांना सोबत घेत चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस चौकीमध्ये संशयीत आरोपीविरोधात भादवी कलम ३०७, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी संशयित सागर सोनार यास तात्काळ अटक केली होती तर या गुन्ह्यातील संशयित विजय जाधव व एक विधी संघर्षित बालक फरार होता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स द्वारे माहिती घेऊन सदर दोघेही संशयतांना सीसीटीव्ही फुटेचची पडताळणी करून ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, सुरेश जाधव ,संदीप खैरनार ,दिनेश नेहे, अनिल कोरडे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार, जनार्दन ढाकणे, यांच्या पथकाने केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी