लाचखोरीला सध्या उधाण आले असून इतक्या ठिकाणी कारवाई होऊनही लाचखोरी कमी होताना दिसून येत नाहीये. त्यात महिलाही मागे नाही राहिल्या. एका कामात पहिला हफ्ता म्हणून 62 हजारांची लाच ( bribe ) घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीमती रुबिया मोहम्मद हनिफ शेख, (वय 35, सहायक अभियंता, वर्ग-1, पाटबंधारे संशोधन व जल नि:सारण उप विभाग, जि.अहमदनगर) व श्रीमती रजनी पाटील, कार्यकारी अभियंता, वर्ग-1,पाटबंधारे संशोधन विभाग, मेरी, दिंडोरी रोड, नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोन्ही महिलांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे, ता.राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक 7,75,963 रुपये अदा केले (Woman executive engineer, assistant engineer caught accepting bribe of Rs 62,000)
म्हणून सदर कामाच्या अदा केलेल्या बिलाचे श्रीमती शेख यांनी स्वतः साठी 8 टक्के प्रमाणे व कार्यकारी अभियंता पाटील यांचे करिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के प्रमाणे 1,39,500 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता श्रीमती रुबिया शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर कामाचे अदा केलेल्या बिलाच्या रकमेचे स्वतःसाठी 8 टक्के प्रमाणे व श्रीमती पाटील यांच्याकरिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. श्रीमती रुबिया शेख यांचे विरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. या सापळा कारवा ईमध्ये रुबिया शेख यांनी 18 टक्क्यांचा पहिला हप्ता म्हणून 62,000 रुपये तक्रारदाराकडुन स्वीकारले त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले. तसेच ही लाच रक्कम स्वीकारण्यास श्रीमती रजनी पाटील यांनी दुजोरा दिला म्हणून श्रीमती रुबिया शेख व रजनी पाटील यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार रवींद्रवीं निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर, सना सय्यद, चालक पोलीस अंमलदार हरून शेख यांनी केली.