28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईमनाशिक येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात २ ठार, ३ गंभीर जखमी

नाशिक येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात २ ठार, ३ गंभीर जखमी

गुरुवारी सकाळी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ (एमएच २० जीटी ००९१) गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीतील २ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले.दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ स्कॉर्पिओचा अपघात झाला. ही स्कॉर्पिओ गाडी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होती. त्यामधील सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर सातत्याने अपघता होत आहेत.

गुरुवारी सकाळी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ (एमएच २० जीटी ००९१) गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये गाडीतील २ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले.दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ स्कॉर्पिओचा अपघात झाला. ही स्कॉर्पिओ गाडी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होती. त्यामधील सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर सातत्याने अपघता होत आहेत.(2 killed, 3 seriously injured in road accident on Nashik’s Samruddhi Highway)

ज्यामध्ये अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या महितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निशा रामकिसन गडगूळ (वय-२०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये वाहन चालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ, मिनाबाई रामकिसन गडगूळ, रामकिसन गडगूळ जखमी आहेत.

अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहन देखील रस्त्यातून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. सहा. पोलिस निरीक्षक – समाधान पाटील पोलिस उपनिरीक्षक – दत्तात्रय चव्हाणके सहा पोलिस उपनिरीक्षक – त्र्यंबक कडाळे पोलिस नाईक – प्रविण गुंजाळ पोलिस कॉन्स्टेबल – त्र्यंबक देशमुख महाराष्ट्र सुरक्षा पथकातील सुरक्षारक्षक मनोज कोटकर , पद्माकर चव्हाण अपघातग्रस्त वाहनातील रुग्णांना मदत कार्य केले. वावी पोलिस सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार एच. डी. कदम, एस. एन. आडके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना समृद्धी महामार्गाकडील रुग्णवाहिकेने औषधोपचारांसाठी सिन्नर व नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी