30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

 

टीम लय भारी
मुंबई : धनगर आणि इतर तत्सम जमाती ज्या एनटी क (NT[c]) वर्गात प्रविष्ट केल्या आहेत त्यांच्यावर अन्याय होतो आहे, अशा आशयाचे पत्र राज्यसभेचे सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तसेच पत्राची एक प्रत इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती व विशेष मागासवर्ग विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही दिलेली आहे. ( Mpsc exam declared on 4th September)

एमपीएससी ची परीक्षा 4 सप्टेंबर ला जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या राखीव जागा सुद्धा जाहीर करण्यात आल्या. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 650 जागा जाहीर केल्या आहेत. (650 seats reserved for NTc sector)

उच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणविसांना दणका, अधिकाऱ्यांच्या इस्त्रायल दौऱ्यावर उपस्थित केला सवाल

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

या 650 जागांमध्ये एन टी (क) प्रवर्गासाठी फक्त 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नियमानुसार 3.5% म्हणजेच 23 जागा या वर्गासाठी राखीव असायला हव्या. परंतु तसे झाले नसल्याने या समाजातील लोकांत रोष वाढत आहे.

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

Mpsc
डॉ. विकास महात्मे

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

या प्रवर्गात प्रशासनाविरुद्ध चीड अशीच वाढत राहिली तर संपूर्ण राज्यात आंदोलने करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. प्रकरण चिघळल्यास कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसे झाल्यास संपूर्ण प्रकरणास सरकार जबाबदार राहील.

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

MPSC Subordinate Service Prelims on September 4

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले नेत्रविषेशज्ञ आणि राज्यसभेचे सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवत पत्रात पुढे म्हटले की, आपण या विषयाचा गंभीरपणे विचार करून योग्य तो निर्णय घ्याल व जातीय गुंता सामोपचाराने सोडवाल. तसे झाल्यास पुढे उद्भवणारा संघर्ष टाळला जाईल.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी