27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeराजकीयराहुल गांधींनी इंधन दरवाढीविरोधात दिल्लीत काढली सायकल रॅली

राहुल गांधींनी इंधन दरवाढीविरोधात दिल्लीत काढली सायकल रॅली

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील 7 वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यते किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दिल्लीत इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी सायकल रॅली काढलेली आहे (In Delhi Rahul Gandhi staged a bicycle rally against the fuel price hike).

या रॅलीत काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली. देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विरोधकांना एकत्र केले आहे. राहुल यांनी सर्व विरोधकांना ब्रेकफास्टसाठी बोलावले होते. या ब्रेकफास्ट मिटींगला 15 पक्षाचे 100 खासदार आले होते. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 15 विरोधी पक्षांची बैठक संपली आहे. आता सर्व खासदार सायकलवरून संसदेत जात आहेत.

शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावरील अदानीचे नामफलक फोडले; संजय राऊतांकडून समर्थन

भारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सरकारला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात आहे. पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत गदारोळ घालत सरकारला जाब विचारणारे विरोधक एकवटले असून यावेळी पुढील रणनीती आखण्यात आली असे बोलले जात आहे. एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत ब्रेकफास्ट मीटचे आयोजन केले होते (The Congress had organized a breakfast meet to bring the opposition together).

Delhi Rahul Gandhi staged a bicycle rally against price hike
दिल्लीत सायकली रॅली

दिवंगत विलासराव देशमुखांची आठवण येतेय, अन्यायग्रस्त एका कुटुंबाची कैफियत

Parliament Monsoon Session Live Updates: Rahul Gandhi calls for ‘Opposition unity’ to stand firm against BJP, RSS

तसेच, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, माकप, भाकप, आययूएमएल, आरएसपी, केसीएम, जेएमएम, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस आणि एलजेडी या बैठकीत सहभागी होत आहेत. यावेळी इंधन दरवाढीविरोधात एकता दाखवण्यासाठी राहुल गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी सायकल रॅली काढली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी