31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयशिवसैनिकांनी मुंबई विमानतळावरील अदानीचे नामफलक फोडले; संजय राऊतांकडून समर्थन

शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावरील अदानीचे नामफलक फोडले; संजय राऊतांकडून समर्थन

टीम लय भारी

मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन आता अदानी समूहाच्या ताब्यात आहे. अदानी समूहाने विमानतळावर स्वत:च्या नावाचा नामफळक लावल्याने शिवसैनिकांनी हा नामफळक उखडून फेकला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचे समर्थन केले आहे. शिवसैनिकांनी योग्यच केले. त्यात चुकीचे काय केले? असा सवाल करतानाच शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे (Sanjay Raut has supported Shiv Sainiks doing at Mumbai airport).

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिले ना तुम्ही हे असेच होत राहणार, असे राऊत म्हणाले.

दिवंगत विलासराव देशमुखांची आठवण येतेय, अन्यायग्रस्त एका कुटुंबाची कैफियत

भाजपने सरकारला ठणकावले, ‘ब्लॅकमेल’ करू नका\

Sanjay Raut supported Shiv Sainik doing Mumbai airport
शिवसैनिकांनी अदानी नामफळक उखाडून फेकले

मुंबईपेक्षा पुण्यात कोरोना रुग्ण अधिक आहे

यावेळी राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात देण्यात आलेल्या शिथिलतेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यातला धोका अजूनही संपलेला नाही. मुंबईपेक्षा पुण्यात कोरोना रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे पुण्याच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसेल. याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अधिक बोलतील. मुंबईतही लोकल सुरू नाही. रेस्टॉरंट बंद आहे. निर्बंध मुंबईतही आहेत. फक्त दुकानांच्या वेळेत फरक आहे, असे राऊत यांनी सांगितले (Sanjay Raut said there are more corona patients in Pune than in Mumbai).

भारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

‘Adani Airport’ signage damaged by Shiv Sena workers in Mumbai

नितीश कुमारांचे आभार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नितीश कुमार बुजुर्ग नेते आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य विरोधी पक्षात गेले आहे. पेगसास विषय हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. आम्ही सर्व लोक या संदर्भात सभागृहात सवाल करत आहोत. सरकार देशाची मन की बात ऐकत नाही. आम्ही सरकारची मन की बात ऐकत आलो आहोत. पण आमची मन की बात ऐकली जात नाही. नितीश कुमार या विषयावर बोलले, त्यांचे आभार, ते एनडीएचे घटक आहेत. ते सरकारच्या सोबत आहेत. पण त्यांचा आत्मा आजही आमच्यासोबत भटकत आहे, असे संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut said that he thanked Nitish Kumar for speaking on the issue).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी