30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeशिक्षणमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ : धनंजय...

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ : धनंजय मुंडे

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थांना दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे(Dhananjay munde give Extension to renewal of scholarship).

2020-2021 या वर्षात अर्ज करण्यात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटींची पुर्तता करणे तसेच अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार मिळत असतो. या वर्गांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेतात. तर यंदा अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मिळवला सिंधुताई सपकाळांच्या संस्थेला अनुदान देण्याचा पहिला मान

धनंजय मुंडे इन ऍक्शन मोड! विधानपरिषदेने पुन्हा अनुभवले जुने धनंजय मुंडे!

धनंजय मुंडेंनी बार्टीला दिला घसघशीत निधी

Maharashtra Scholarship Result 2021: MSCE PUP Class 5, PSS Class 8 results declared on mscepuppss.in

धनंजय मुंडे म्हणाले, काही कोर्सेसच्या सामायिक प्रक्रिया परीक्षांचे (CET) राउंड अजून सुरू असल्या कारणाने 12 जानेवारी पर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचाच विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवरी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी