30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयसरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पायाभूत प्रकल्पांसाठी रात्रभर चालू राहणार वाहतूक

सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पायाभूत प्रकल्पांसाठी रात्रभर चालू राहणार वाहतूक

टीम लय भारी

मुंबई:- राज्य सरकारने  खडी आणि वाळूच्या रात्रभर वाहतुकीला   परवानगी दिली आहे . मेट्रोपुरती मर्यादित असल्याने उर्वरित राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेगाने व्हावीत, यासाठी आता रात्रीही उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यातील सर्वच्या सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत असणे बंधनकारक करण्यात आलेलेआहे(Government Important decision projects continue overnight)

राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पायाभूत किंवा जलसंपदा प्रकल्पाच्या कामासाठी विभागीय आयुक्तांना आवश्यकता वाटल्यास रात्रीच्या वेळी देखील गौण खनिजाच्या उत्खननाची व वाहतूकीची परवानगी देण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.राज्य सरकारने  आता खडी आणि वाळूच्या वाहतुकीला खुली सुट दिली त्यामुळे ही वाहतूक आता रात्रभर चालू राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

MPSC परीक्षांच्या ऑनलाईन अर्जात त्रुटी आढळून आल्याने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल

मनसेला धक्का, विदर्भातील नेते अतुल वंदिले राष्ट्रवादीच्या गळाला!

Maharashtra govt waives Rs 3.3 crore fine imposed on Sena MLA’s housing project in Thane

  कुंभार, वडार समाजाच्या पारंपारिक व्यवसाय सुरळीत रहावा या अनुषंगानेच राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला. बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या खडी, वाळू, सिमेंट आणि लोखंडाची वाहतुक करण्यास वेळेची मर्यादा राहणार नाही. या सोबतच राज्यामध्ये होणाऱ्या खनिजाच्या वाहतूकीस राज्य शासन वेळोवेळी निश्चित करेल त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टन किंवा प्रति ब्रास ‘नियमन शुल्क’ आणि सेवा शुल्क वाहतूकदाराने किंवा खाणपट्टाधारकाने राज्य शासनास द्यावे लागणार आहे.

दरम्यान, खाणकामाचा पारंपरिक व्यवसाय चालू ठेवण्यास इच्छुक असणाऱ्या कुंभार आणि वडार समाजाच्या कुटुंबांच्या बाबतीत अर्ज केल्यानंतर स्फोटक किंवा स्फोटकाशिवाय उत्खनन करण्यास देखील परवानगी देण्यात येणार आहे.महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 या नियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी