25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजतर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

तर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

टीम लय भारी
भारतीय थाळीफेक पटू कमलप्रीत कौर हिने टोकियो ऑलम्पिक 2020 च्या प्रथम फेरीत दमदार कामगिरी केलेली आहे. (Discus throw Olympic 2020 )

अंतिम फेरीत निवड होण्यासाठी 64 मीटर इतकी थाळीफेक करावी लागते. आणि या फेरीसाठी फक्त 2 महिलांची निवड झालेली आहे. अंतिम फेरी 2 ऑगस्ट रोजी होईल. (Kamalprit kaur scores 64 m to enter for final round)

5 हजारापेक्षा कमी किंमतीत टॉप 10 स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

Discus throw
तर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला

2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कृष्णा पूनियाने उत्तुंग कामगिरी केली त्याला नऊ वर्षे झाली, जिथे ती डिस्कस थ्रो स्पर्धेत 63.62 मीटर थ्रोसह सहाव्या स्थानावर होती. आजपर्यंत, ऑलिम्पिकमधील ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये भारतीय महिला खेळाडूने मिळवलेली ही एक दुर्मिळ कामगिरी आहे.

जर कमलप्रीतने भारतात जो विक्रम केला त्याची पुनरावृत्ती ती पुन्हा करू शकली आणि 66.59 मीटर दूर थाळी फेकू शकली, तर ती निश्चितपणे सुवर्णपदक जिंकेल. तीच्यात सतत सुधारणा होत आहे. मार्चमध्ये 65.06 मीटर फेकून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यापासून आणि जूनमध्ये 66.59 मीटरने स्वतःचाच विक्रम मोडणे, हे एक अतिशय उत्साहवर्धक चिन्ह आहे, असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि तिचे मार्गदर्शक वीरेंद्र म्हणाले.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान

Tokyo Olympics: Kamalpreet Kaur storms into the Discus Throw final https://thebridge.in/athletics/tokyo-olympics-kamalpreet-kaur-final-scintillating-throw-23823

फेडरेशन कप मध्ये तिने 65 मीटर चा विक्रम केला होता त्यांनतर जून मध्ये पतियाळा येथे तोच विक्रम 66.59 मीटर ने मोडला. जर या विक्रमाची ती पुनरावृत्ती करू शकली तर भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी तिला कुणीही रोखू शकत नाही. वय वर्षे 25 च्या मुलीला इतक्या कमी वयात मिळालेले हे यश आहे.

अशी काही मोजकीच प्रकरणे आहेत जिथे खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही पूर्व अनुभव न घेता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी कामगिरी केली आहे. कमलप्रीतला कॉमनवेल्थ गेम्स किंवा एशियन गेम्स किंवा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव नाही आणि हा तिचा मायनस पॉईंट आहे असे तिचा मार्गदर्शक यावेळी म्हणाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी