28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयजाहीर सभा संपल्यावर 'वंदे मातरम्' बोलण्याची पद्धत 'ह्या' संगीतकारांनी केली सुरू

जाहीर सभा संपल्यावर ‘वंदे मातरम्’ बोलण्याची पद्धत ‘ह्या’ संगीतकारांनी केली सुरू

प्राची ओले : टीम लय भारी

मुंबई : जाहीर सभा संपल्यावर ‘वंदे मातरम्’ बोलले जाते. ही प्रथा सुरु केली होती थोर संगीतकार, कीर्तनकार पंडित विष्णू पलुस्कर यांनी. रघुपती राघव राजाराम हे भजन ज्यांनी लोकप्रिय केले तेच हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. यांनीच संगीताचा मोठा वारसा असणारे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली (At the end of the public meeting Vande Mataram is spoken).

महाराष्ट्रातील एक थोर संगीतप्रसारक, गायनाचार्य पंडित विष्णू पलुस्कर यांचा जन्म 18 ऑगस्ट, 1872 रोजी कुरुंदवाड येथे झाला. त्यांना लहापणापासून संगीताची आवड होती. त्यांनी मिरजच्या पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या कडून संगीतविद्या धारण केली.  उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात आणली ते पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर होते. त्यांच्याकडून पलुस्कर यांनी शुद्ध स्वरुपात गायकी प्राप्त केली. आलाप, बोल उपज आणि वजनदार ताना या तिन्ही अंगांचा समतोल साधून त्यांनी गोड, सुरीला व बुलंद आवाज प्राप्त केला.

जितेंद्र आव्हाडांनी घेतली बैठक : तळीये मध्ये 261 घरे उभी राहणार

आमदार यामिनी जाधव यांची आयकर विभागामुळे आमदारकी धोक्यात?

संगीतकलेला सामाजिक प्रतिष्ठा व कलावंताना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी संगीताचा प्रसार करणे, संगीताचे शिक्षण जनतेला मुक्तहस्ते व कमी खर्चात मिळावे म्हणू त्यांनी ठिकठिकाणी संगीत विद्यालये सुरु केली. 5 मे रोजी त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयातून त्यांनी संगीताचे शिक्षण देऊन संगीतकलेला शिस्तबद्ध  वळण लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रीयानासुद्धा संगीताचे धडे दिले. संगीतकारांसाठी, संगीतकारांची व संगीतकारांनी चालवलेली संगीत संस्था असे या विद्यालयाचे स्वरूप होते. 1908 ला त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना मुंबई येथे केली. त्यांनी संगीतविषयक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली. ती स्वरलिपी आता ‘पलुस्कर- पद्धती’ म्हणून ओळखली जाते. 1921 साली त्यांनी काळाराम मंदिरासमोर पंचवटी येथे ‘श्री रामनाम आधारश्रम’ ची स्थापना केली (In 1921 he established ‘Shri Ramnam Aadharshram’ at Panchavati in front of Kalaram Temple).

At the end of the public meeting Vande Mataram is spoken
पंडित विष्णू पलुस्कर यांनी गांधर्व या संगीत महाविद्यालयाची स्थापना केली

ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटीची संपत्ती केली जप्त

18 August: भक्त हृदय गायक, जानें आज का इतिहास

स्वतःची एक वेगळी अशी संगीतलेखन त्यांनी निर्माण केली होती. त्यांनी या विषयातील 60 पुस्तके लिहून प्रसिद्ध केली. राष्ट्रीय संगीत, महिला संगीत, बंगाली गायन, कर्नाटकी संगीत, बालोदय संगीत, संगीत बालबोध, मृदुंग-तबला पाठ्यपुस्तक इत्यादी विषयांवरील पुस्तके लिहिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी