30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयमहात्मा गांधी मुस्लिमांचं खरंच तुष्टीकरण करीत होते का ?

महात्मा गांधी मुस्लिमांचं खरंच तुष्टीकरण करीत होते का ?

'लय भारी ' ने काही दिवसांपूर्वी ' गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलाय का ... हा विषेशांक प्रसिद्ध केलाय. रफिक मुल्ला यांनी लिहिलेला हा लेख गांधीजीं संबंधित अनेक विषयांचा उहापोह करणारा आहे घटना 1915 मधील प्रसंग एक- हरिद्वारला कुंभमेळा भरला होता महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेन ने निघाले होते ट्रेन सहारनपुरला थांबली एक मुस्लिम युवक पाणी घेऊन आला पण बोगीतल्या अनेकांनी तहान असूनही त्याच्या हातचे पाणी घेतले नाही. गांधींनी आश्चर्याने चौकशी केली, तेव्हा समजले की हिंदू मुस्लिम द्वेष भावनेमुळे दोन्ही बाजूचे लोक असे वागतात. गांधींना लक्षात आले हा प्रश्न फार जटील आहे.

‘लय भारी ‘ ने काही दिवसांपूर्वी ‘ गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलाय का … हा विषेशांक प्रसिद्ध केलाय. रफिक मुल्ला यांनी लिहिलेला हा लेख गांधीजीं संबंधित अनेक विषयांचा उहापोह करणारा आहे
घटना 1915 मधील
प्रसंग एक- हरिद्वारला कुंभमेळा भरला होता महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेन ने निघाले होते (relation between mahatma gandhi and islam) ट्रेन सहारनपुरला थांबली एक मुस्लिम युवक पाणी घेऊन आला पण बोगीतल्या अनेकांनी तहान असूनही त्याच्या हातचे पाणी घेतले नाही. गांधींनी आश्चर्याने चौकशी केली, तेव्हा समजले की हिंदू मुस्लिम द्वेष भावनेमुळे दोन्ही बाजूचे लोक असे वागतात. गांधींना लक्षात आले हा प्रश्न फार जटील आहे.
प्रसंग दोन- दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक बंदी बनवून ठेवण्यात आले होते. गांधी भेटण्यास गेले, तेव्हा चहाची वेळ होती. मुस्लिम चहा आला होता, मुस्लिम कैद्यांना तो दिला गेला. हिंदू चहा अद्याप यायचा होता. गांधींनी विचारले हा काय चहा आहे…. तेव्हा त्यांना समजले की, सैनिकांमध्ये भेद नाही पण तसं सरकारी आदेश आहे. हिंदू आणि मुस्लिमांना धार्मिक आधारावर वेगळा चहा द्यायचा, असे त्या आदेशात म्हटले होते. गांधी नेहमीच देशातल्या धार्मिक तणावासाठी इंग्रजांना दोषी धरत. तेव्हाचे व्हॉईसरॉय वाबल यांना एका भेटीत त्यांनी तसे स्पष्ट सुनावले होते.तुम्ही आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करू नका.या विषयापासून दूर राहा. पण इंग्रज त्यांचे काम करीत राहिले.
दक्षिण आफ्रिकेत असल्यापासून गांधींना हे उमगले होते कि, भारतात एकतेची भावना निर्माण केली तरच इंग्रजांविरोधातील लढाई आकार घेऊ शकेल , गांधींनी सर्व पातळ्यांवर तसे प्रयत्न केल्याचे वारंवार दिसते, अगदी खिलाफत चळ्वळीचेही त्यांनी समर्थन केले आणि मुस्लिमधार्जिणे असल्याचा पहिला आरोप त्यांच्यावर केला गेला. उत्तर प्रदेशचे काश्मीरी ब्राह्नण नेते, नावात थेट पंडित असणारे नेहरू तर मूलतः मुस्लिम आहेत, असा खुला अधिकृत प्रचार करण्यापर्यंत विषय पुढे गेला, मात्र अशा आरोपांचे उत्तर दोघेही आपल्या कार्यातून देतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी