28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeसंपादकीयTirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

Tirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

दान करणाऱ्याला कोणताही धर्म नसतो. तर धर्म हा दानात असतो. हे एका मुस्लिम जोडप्याने सिद्ध करुन दाखवले आहे. तसेच धार्मीक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळयात झणझणीत अंजन घातले आहे. या जोडप्याने एकदा नव्हे तर तब्बल तिनदा दान केले आहे. यावेळी मुस्लिम जोडप्याने तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) 1.02 कोटी रुपयांचे दान दिले.

दान करणाऱ्याला कोणताही धर्म नसतो. तर धर्म हा दानात असतो. हे एका मुस्लिम जोडप्याने सिद्ध करुन दाखवले आहे. तसेच धार्मीक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळयात झणझणीत अंजन घातले आहे. या जोडप्याने एकदा नव्हे तर तब्बल तिनदा दान केले आहे. यावेळी मुस्लिम जोडप्याने तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) 1.02 कोटी रुपयांचे दान दिले. याच जोडप्याने पूर्वी 35 लाख रुपयांचे दान दिले होते. हे जोडपे आंध्रप्रदेशचे आहे. अब्दुल गनी आणि त्याची पत्नी सुबीना बानो यांनी हे दान देवस्थानाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दानापैकी 87 लाख रुपये नव्याने तयार झालेल्या पद्मावती रेस्ट हाउसच्या फर्नीचरला तसेच भांडयांसाठी देण्यात येणार आहेत.

यामध्ये अन्ना प्रसादम ट्रस्टसाठी 15 लाखांचा डिमांड ड्राफ्टचा समावेश आहे. त्याचा उपयोग दर रोज मंद‍िरात केल्या जाणाऱ्या मोफत भोजनासाठी करण्यात येणार आहे. या कुटुंबाने पहिल्यांदा तिरुमाला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष धर्मा रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यानंतर पुजाऱ्यांनी वेदसिरवचनम म्हटले, आणि अब्दुल गनी आणि त्यांच्या परिवाराला मंदिरातील प्रसाद दिला. अब्दुल गनी हे एक व्यवसाय‍िक आहेत. त्यांनी यापूर्वी देखील मंद‍िराला दान दिले आहे. 2020 मध्ये त्यांनी कोरोना महामारीच्या वेळी कीटाणुनाशक स्प्रे फवारण्यासाठी ट्रॅक्टर माउंटेड स्प्रे दान दिले होते. त्यापूर्वी सुबीना बानो आणि अब्दुल गनी यांनी मंद‍िराच्या प्रसादालयातील भाजीपाला ठेवण्यासाठी 35 लाखांचा फ्रीज भेट दिला होता.

हे सुद्धा वाचा

Congress : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘दोन’ महत्त्वाचे नेते आघाडीवर

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

व्यंकटेश्वर बालाजी मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर तिरुमला डोंगरावर आहे. दक्षिण भारतातील हे मंद‍िर अतिशय सुंदर आहे. तसेच ते अतिषय लोकप्र‍िय देखील आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तुर जिल्हयात हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये महिला व पुरूष आपले केस कापून दान देतात. आपल्यातील निगेटीव्हीटी आणि पापक्षालनार्थ हे केसांचे दान दिले जाते.

भगवान बालाजीला दर रोज तुलसी पत्र अर्पण केले जाते. ते तुलसी पत्र नंतर विह‍िरीमध्ये टाकले जाते. दिवसातून तीन वेळा बालाजीचे दर्शन घेतले जाते. पहिल्या दर्शनाला विश्वरुप म्हणतात, ते सकाळी घेता येते. तर दुसरे दर्शन दुपारी घेता येते. तर तिसरे रात्री घेता येते. बालाजीची मूर्ती सोने व इतर हिरे माणकांनी मढवलेली आहे. या मूर्तीची उंची दोन मीटर आहे.

हे मंदिर दाक्षिणात्य गोपुर शैलीमध्ये बांधलेले आहे. तिरुमला पर्वतरांगेत हे मं‍दिर असून, याला श्रीमलय देखील म्हणतात. ही मूर्ती स्वयंभू आहे. अंदाजे 2000 वर्षांची आहे. सर्वात पहिल्यांदा पल्लव राणी समवाई ह‍िने 614 मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. त्यानंतर, चोळ, पल्लव राजांनी या मंद‍िरासाठी योगदान दिले. तर कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा मुलामा दिला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराची देखभाल केली हाेती. 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये अनेकांनी या मंदिरासाठी देणग्या दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी