33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
HomeराजकीयCongress : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये 'दोन' महत्त्वाचे नेते आघाडीवर

Congress : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘दोन’ महत्त्वाचे नेते आघाडीवर

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे (Congress) अध्यक्षपद गांधी घराण्याकडे राहणार की, आणखी कोणाला संधी मिळणार यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र काही दिवसात काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे (Congress) अध्यक्षपद गांधी घराण्याकडे राहणार की, आणखी कोणाला संधी मिळणार यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र काही दिवसात काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहूल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अशोक गहलोत आणि शशी थरुर यांच्यामध्ये काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. अशोक गहलोत हे आज दिल्लीमध्ये सोन‍िया गांधीची भेट घेणार आहेत. कारण राहूल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याच्या मानस‍िकतेमध्ये नाहीत.

अनेकांना वाटते की, गांधी घराण्यातील अध्यक्ष असावा. त्यामुळे अध्यक्षपदावरुन काँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याच्या बाहेरचा व्यक्ती अध्यक्षपदाचा दावेदार बनणार आहे. राहूल गांधी हे ‘भारत जोडो ‘यात्रेवर गेले आहेत. ते ही यात्रा थांबवून दिल्लीला परत येऊ शकत नाहीत. तर काँग्रेसच्या अनेक जणांनी राहूल गांधीच अध्यक्ष व्हावे असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

Actress Samantha Ruth Prabhu : अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु घेतेय परदेशात उपचार

जर राहूल गांधी अध्यक्षपदासाठी इच्छू नसतील तर मी निवडणूक लढण्याचा प्रस्ताव सोन‍िया गांधी समोर ठेवेन असे गहलोत यांनी म्हटले आहे. तसेच राहूल गांधीचा दौरा सद्य‍ा दक्षिण भारतात सुरू आहे. ते सद्या कोच्चीमध्ये आहेत. अशोक गहलोत स्वत: कोचीला जावून त्यांना अध्यक्षपदासाठी राजी करण्याचे प्रयत्न करणार आहेत. राहूल गांधीनी ऐकले नाही तर अशोक गहलोत आणि शश‍ि थरुर यांच्यात हा सामना रंगणार असल्याचे न‍िश्चित आहे. सोन‍िया गांधीनी काही ‍महिन्यांपूर्वी अशोक गहलोत यांना काँग्रेसची धूरा सांभळण्यास सांगितले होते.

या विषयावर सोन‍िया गांधीबरोबर शशि थरुर यांनी चर्चा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशोक गहलोत यांना पसंती आहे. अशोक गहलोत आणि शश‍ि थरुर हे दोघेही काँग्रेसमधील विश्वासू नेते समजले जातात. ते खुप वर्षांपासून काँग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिले आहेत. शशि थरुर काँग्रेसच्या 23 नेत्यांचे प्रमुख आहेत. त्यांनी 2020 मध्ये पक्ष नेतृत्वामध्ये बदल करण्याची मागणी केली होती.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने मे महिन्यामध्ये उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरामध्ये काँग्रेसमध्ये काही सुधारणा करण्याचे नियोजन केले होते. त्यावेळी 17 ऑक्टोबरला मतदान घेण्याचे ठरले होते. त्याचा निकाल 19 ऑक्टोबरला घोषीत होणार होता. त्यानंतर अध्यक्षपदासाठी 24 सप्टेंबरपासून नामांकन सुरू होणार होते. नामांकनाचा शेवटी तारीख ही 30 सप्टेंबर आहे. तर 8 ऑक्टोबरला नामांकन मागे घेता येतील असे ठरले होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे काँग्रेसने धोरण अवलंबले तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूका निश्चित घेतल्या जाऊ शकतात हे स्पष्ट होते. परंतु काही दिवसात या बाबत ठोस माहिती समोर येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी