31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeसंपादकीयकाय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी मतदान केल्याचे आढळून आले आहे(What happened to the guarantee given by Modi). भाजपने केलेली मतदारांची फसवणूक हि या कमी मतदानाला जबाबदार असू शकते. आपण निवडून दिलेले सरकार आपल्या कमी येत नाहीये. आपले महागाईचे, शिक्षणाचे,बेरोजगारीचे, स्त्रियांचे सगळे प्रश्न आहे तसेच पडून आहेत. उद्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढ्या आम्हाला विचारतील, कि त्यावेळी अनुत्तरित राहिलेल्या या प्रश्नांवर काय केलं तुमच्या तत्कालीन सरकारनी, तेव्हा आपण काय सांगणार आहोत, असा प्रश्न धनंजय वंजारी (निवृत्त पोलीस अधिकारी) आम आदमी पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष यांनी लय भारी शी संवाद साधताना उपस्थित केला. https://studio.youtube.com/video/x-s5mBeJQf8/edit

आज भारतात एवढे राष्ट्रीय पक्ष असताना, त्यापैकी ४-४ नेते जर कोणाचे तुरुंगात असतील तर तो आम आदमी पक्ष आहे. या लोकसभा निवडणुकी मध्ये आप ने महाविकास आघाडीला पाठींबा देण्याचे ठरवले असून मी अरविंद सावंत यांच्या प्रचाराचं काम पाहतोय. अरविंद सावंत हे १०० टक्के खासदार होतील. दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचं देखील पारडं जड आहे, त्यांनाही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय, त्यामुळे त्यांच्या हि विजयाचा अंदाज धनंजय वंजारी यांनी लय भारीशी बोलताना व्यक्त केला. महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळणं कठीण असून ,याउलट महाविकास आघाडीला ३०० च्या वर जागा मिळू शकतात . धार्मिक विषयाचं भाजपने केलेले राजकारण लोकांच्या आता लक्षात आलेले आहे. मोजून ३-४ टक्के लोकांचा विकास करून तो ९० टक्के लोकांचा म्हणून दाखवण्यात भाजप(BJP) माहीर आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde), त्यांच्या सोबत निघून गेलेले जे काही ३०-४० जण असतील त्यांच्याविषयी आता मतदारांच्या मनात घृणा निर्माण झालेली आहे. याउलट अरविंद केजरीवालां(Arvind Kejriwal) सोबत असलेल्या माणसांना जेव्हा जेव्हा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा तो अयशस्वी ठरलाय. आप च्या लोकांनी जेल मध्ये जाणं पसंद केलं, आपला स्वाभिमान कोणाला विकला नाही असे निवृत्त पोलीस अधिकारी तसेच आम आदमी पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष धनंजय वंजारी यांनी लय भारीशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी