28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeएज्युकेशनसीईटीचा निकाल 'या' दोन संकेतस्थळांवर पाहायला मिळणार !

सीईटीचा निकाल ‘या’ दोन संकेतस्थळांवर पाहायला मिळणार !

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने शुक्रवारी महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET) निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. एमएचटी- सीईटी चा निकाल 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल. राज्य सामाईक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 19 प्रवेश परीक्षांपैकी 17 परीक्षा घेण्यात आल्या असून त्यापैकी 16 परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षांना एकूण 9 लाख 13 हजार 16 विद्यार्थी उपस्थित होते. उर्वरित दोन परीक्षा जून आणि जुलैमध्ये घेण्यात येतील.
बी. एस्सी नर्सिंग-सीईटी 2023 ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच सीईटी कक्षामार्फत दिनांक 19 जूनला घेण्यात येणार आहे. त्यासाठी 31 हजार 380 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यातील एकूण 75 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.शैक्षणिक वर्ष 2023- 2024 याकरिता विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया 2023 जून महिन्यापासून रबविण्यात येणार आहे.

हे सुध्दा वाचा :

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा साखरपुडा संपन्न, या बड्या अभिनेत्यांनी लावली उपस्थिती

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला, समुद्रात मच्छिमारांनी न जाण्याचा दिला इशारा

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे – शरद पवार

व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल माहिती –

1. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करता येणार आहे.

2. एपीआयद्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्राची पडताळणी करता येईल.

3. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारा सातबारा उतारा आदींची करता येणार पडताळणी करण्यात येणार आहे.

4. प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन, शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रमांचे केले जाईल आयोजन.

5. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानांतर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मानयतेबाबत संस्था,
महाविद्यालये तसेच विद्यार्थींच्या लॉगीन आयडीमध्ये कळविण्यात येणार .

www.mahacet.in, www.mahacet.org या दोन संकेतस्थळांवर पाहू शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी