आयसीएमएआय (दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस ऑफ इंडिया) च्या वतीने दि. १७ व १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सीएमए विद्यार्थ्यां करिता दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन गुरुदक्षिणा ऑडिटरियम, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती नाशिक चॅप्टरचे चेअरमन सीएमए आरिफ खान मन्सूरी यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनास आयसीएमएआय चे राष्ट्रीय अध्यक्ष सीएमए अश्विनकुमार दलवाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याच बरोबर पश्चिम विभागाचे चेअरमन सीएमए चैतन्य मोहरीर, सीएमए मिहीर व्यास, सीएमए अरिंदम गोस्वामी, सीएमए नैन्टी शाह आदी उपस्थित असणार आहेत.
सदरच्या दोन दिवसीय संमेलनात विद्यार्थ्यांकरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रामुख्याने सीएमए अभ्यासक्रम विषयी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यश संपादन कसे करावे याकिरता मोटिव्हेशनल सत्र असणार आहेत. यानंतर अभ्यासक्रमावर आधारित विविध महत्वपूर्ण विषयवार तज्ञ व्यक्ते मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने प्रश्नमंजुषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाशिक चॅप्टर चे सचिव सीएमए धनंजय जाधव यांनी दिली आहे.
एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या ज्ञानर्जना सोबतच मनोरंजनात्मक दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन होत असून यात सीएमए विद्यार्थांनी आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संमेलनाचे कन्व्हेनर आणि आयसीएमएआयच्या पश्चिम विभागाचे सचिव सीएमए मिहीर व्यास यांनी केले आहे.