29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनगांधी पीस फाउंडेशन(जि,पी,एफ,एन) च्या वतीने ऑननरी डॉक्टरेट पदवीदान समारंभ आयोजन

गांधी पीस फाउंडेशन(जि,पी,एफ,एन) च्या वतीने ऑननरी डॉक्टरेट पदवीदान समारंभ आयोजन

नाशिक येथील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह गंगापूर रोड या सभागृहामध्ये गांधी पीस फाउंडेशन आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान समारंभ आयोजित केला गेला यावेळी गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर एल बी राणा (जि.पि.एफ.एन.), राष्ट्रसंत महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महंत भक्तीचरणदासजी, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे, ग्रीन रिसोर्स चे अध्यक्ष डॉक्टर यु के शर्मा, डॉक्टर आशाताई पाटील प्रमुख ग्रा र स, भाजप जेष्ठ नेते लक्ष्मन सावजी, डॉक्टर सुनील कुटे, के के वाघ कॉलेज एचडी, सुनील सिंह परदेशी यांच्या विशेष उपस्थितीत विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना पदवीदान समारंभामध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

नाशिक येथील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह गंगापूर रोड या सभागृहामध्ये गांधी पीस फाउंडेशन आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान समारंभ आयोजित केला गेला यावेळी गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर एल बी राणा (जि.पि.एफ.एन.), राष्ट्रसंत महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महंत भक्तीचरणदासजी, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे, ग्रीन रिसोर्स चे अध्यक्ष डॉक्टर यु के शर्मा, डॉक्टर आशाताई पाटील प्रमुख ग्रा र स, भाजप जेष्ठ नेते लक्ष्मन सावजी, डॉक्टर सुनील कुटे, के के वाघ कॉलेज एचडी, सुनील सिंह परदेशी यांच्या विशेष उपस्थितीत विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना पदवीदान समारंभामध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. Nashik

ह भ प अण्णासाहेब जानकर, गुरुचरण सिंग यदू, समाजरत्न भागवत, एडवोकेट मंगेशनेने वाक्यात समाजसेविका ज्योती केदारे शिंदे यांच्या सहित आणखी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 32 मान्यवरांना आपल्या बहुमूल्य योगदानासाठी व भरगच्च अनुभवामुळे पदवी बहाल करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी पदवी प्राप्त झालेल्या प्रत्येक मान्यवराच्या विशेष कार्य विषयी माहिती देऊन चांगल्या पद्धतीने केली.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी , ऐतिहासिक वास्तू माहिती, शैक्षणिक विभागात असलेली अग्रेसरता यामुळे नासिक येथील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले समाज रत्न श्री अमोल भागवत यांना महाराष्ट्रातून सामाजिक उपक्रम व जनजागृतीपर डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल, गुच्छ व इतर काही सवलती यांच्या बाबतीत पत्रक देण्यात आली.
यावेळी बोलताना “समाज रत्न अमोल भागवत” यांनी सुरुवात अतिशय भावनिक पद्धतीने करून सांगितले की “परमेश्वराला मी पाहिलेला नाही परंतु माझ्या आई-वडिलांना मी पाहिलेले आहे”

त्यांनी लहानपणापासून आमच्यावर केलेले संस्कार मनामध्ये ठासवलेल्या काही विशिष्ट गोष्टी आणि त्यांचे त्यावेळचे मार्गदर्शन त्यानंतर आपला परिवार कुटुंब आणि समस्त मित्रपरिवार ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध मार्गाने मला सहकार्य केले या सर्वांचा मी ऋणी आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर उर्वरित सर्व पदवीधारकांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी बहाल करण्यात आली.
समारंभ अतिशय नियोजनशील पद्धतिने पार पाडण्यात आला.

त्यांनी लहानपणापासून आमच्यावर केलेले संस्कार मनामध्ये ठासवलेल्या काही विशिष्ट गोष्टी आणि त्यांचे त्यावेळचे मार्गदर्शन त्यानंतर आपला परिवार कुटुंब आणि समस्त मित्रपरिवार ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध मार्गाने मला सहकार्य केले या सर्वांचा मी ऋणी आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर उर्वरित सर्व पदवीधारकांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी बहाल करण्यात आली.
समारंभ अतिशय नियोजनशील पद्धतिने पार पाडण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी