35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनछात्रसैनिकांनी अनुभवले लढाऊ तोफांचे प्रात्यक्षिक

छात्रसैनिकांनी अनुभवले लढाऊ तोफांचे प्रात्यक्षिक

अंबिका मित्र मंडळ च्या माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत शाळेतील वायुसेनेच्या 44 NCC छात्रसैनिकांना भारतीय सैन्य प्रशिक्षणातील एक महत्वाचे केंद्र असलेल्या "देवळाली आर्टिलरी केंद्राला" भेट देण्याची संधी मिळाली. सर्वप्रथम कॅडेट्सना भारतीय युद्ध दलातील आधुनिक तोफांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट देता आली. यावेळी भारतीय आणि विदेशी बनावटीच्या लहान मोठया अशा आधुनिक तोफा अगदी जवळून पहाता आल्या. प्रत्येक तोफेचे सूक्ष्म विश्लेषण यावेळी माहीत करुन घेता आले. यात धनुष , अल्ट्रा लाईट हो्विटझर (ULH ), K-9 वज्र, ग्रेड BM 21 रॉकेट लाँचर , 122 mm D 20 हो्विटझर , स्वाती रड्डर , यासारख्या आधुनिक काळातील शक्तिशाली लढाऊ तोफा पहाता आल्या.

अंबिका मित्र मंडळ च्या माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत शाळेतील वायुसेनेच्या 44 NCC छात्रसैनिकांना भारतीय सैन्य प्रशिक्षणातील एक महत्वाचे केंद्र असलेल्या “देवळाली आर्टिलरी केंद्राला” भेट देण्याची संधी मिळाली. सर्वप्रथम कॅडेट्सना भारतीय युद्ध दलातील आधुनिक तोफांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट देता आली. यावेळी भारतीय आणि विदेशी बनावटीच्या लहान मोठया अशा आधुनिक तोफा अगदी जवळून पहाता आल्या. प्रत्येक तोफेचे सूक्ष्म विश्लेषण यावेळी माहीत करुन घेता आले. यात धनुष , अल्ट्रा लाईट हो्विटझर (ULH ), K-9 वज्र, ग्रेड BM 21 रॉकेट लाँचर , 122 mm D 20 हो्विटझर , स्वाती रड्डर , यासारख्या आधुनिक काळातील शक्तिशाली लढाऊ तोफा पहाता आल्या.

यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण मैदानातून तोफांचे फायरिंग कॅडेट्सना जवळून अनुभवता आले. शेवटी देवळाली आर्टिलरी केंद्राचा 1860 पासूनचा इतिहास जिवंत करुन दाखवणारे “रुद्रनाद Museum” कॅडेट्सना पाहण्याची संधी मिळाली. आजच्या या क्षेत्रभेटीतून भारतीय युद्धदलाची शक्ती कॅडेट्सना अनुभवता आली.

शाळेचे एअर फ़ोर्स एन सी सी ऑफिसर T/O भटू पाटील यांच्या प्रयत्नाने यांना ही संधी मिळाली त्यावेळी केशव जगताप , कुमुद मोरे , मुख्याध्यापक सतीश भालेराव यांनी ही या संधीचा लाभ घेतला. यावेळी नंबर वन महाराष्ट्र वायुसेना एन सी सी, मुंबई युनिटचे करपोरल कार्तिक पटेल आणि सार्जेन्ट लवलेश कुमार यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी