27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमनोरंजनSanjay Dutt :खलनायकाच्या भूमीकेसाठी संजय दत्त यांना 10 कोटींची ऑफर

Sanjay Dutt :खलनायकाच्या भूमीकेसाठी संजय दत्त यांना 10 कोटींची ऑफर

बॉल‍िवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे नाव आहे. अनेक कलाकारांनी हिरोची भूमीका बजावतांना व्हिलनची भूमीका देखील बजावली आहे. त्यापैकी एक नाव आहे संजय दत्त.

बॉल‍िवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे नाव आहे. अनेक कलाकारांनी हिरोची भूमीका बजावतांना व्हिलनची भूमीका देखील बजावली आहे. त्यापैकी एक नाव आहे संजय दत्त. पुन्हा एकदा संजय दत्त खलनायकाची भूमीका वठवणार आहेत. डायरेक्टर कनागराज यांच्या गँगस्टरवर आधारित एक्शन-थ्र‍िलर फ‍िल्ममध्ये संजय दत्त काम करणार आहेत. यामध्ये ते खलनायकाची भूमीका बजावणार आहेत. संजय दत्त (Sanjay Dutt) हे एका भयानक विलनची भूमीका बजावणार आहेत. संजय दत्त यांनी या चित्रपटासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

या चित्रपटामध्ये हिरोची भूमीका साऊथचा प्रसिद्ध हीरो थलापती विजय करणार आहे. थलापती विजय हा एका गँगस्टरच्या भुमिकेत द‍िसणार आहेत. या चित्रपटाची शूटींग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. डायरेक्टर लोकेश कनागराज यांच्या चित्रपटाला संजय दत्तने पसंती दर्शवली आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेच्या बंडाची 13 देशांनी घेतली नोंद

Eknath Shinde : पैठणच्या विकासावर बोलतांना एकनाथ शिंदेनी मारला सुप्र‍िया सुळेंना टोला

Milk Price : दूध दर वाढीचे संकट लवकरच कोसळणार

संजय दत्त हे‍ हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आण‍ि निर्माता आहेत. त्यांना आई वडीलांकडून अभ‍िनयाचा वारसा मिळाला. संजय दत्त यांनी 1981 पासून 100 चित्रपट केले. सु‍न‍िल दत्त हे त्याचे वडील असून‍, नर्गिस त्यांची आई आहे. 1981 मध्ये ‘राॅकी’ हा चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच नर्गिस दत्त यांचे कर्करोगाचे निधन झाले. त्यावेळी संजय दत्त 22 वर्षांचे होते. संजय दत्त यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी यांच्या शिक्षणाची सुरूवात हिमाचल प्रदेशमध्ये झाली.

त्यांनी लहानपणा पासून चित्रपटात काम करायला सुरूवात केली. त्यांनी ‘रेश्मा‘ आणि ‘शेरा‘ या चित्रपटात बालकलाकारची भूमीका केली. त्यांचे हे चित्रपट प्रचंड लोकप्र‍िय ठरले. संजय दत्त हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. त्याने कॉमीडी, रोमांटीक, खलनायकाच्या भूमीका चांगल्या वठवल्या आहेत. ‘मुन्ना भाई एमबीबीए‘ हा त्यांचा चित्रपट ‘ब्लॉक बास्टर‘ठरला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी