26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमनोरंजनकंगनाची आकाशाला गवसणी... बहुचर्चित 'तेजस' सिनेमाचा टिझर प्रदर्शित

कंगनाची आकाशाला गवसणी… बहुचर्चित ‘तेजस’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

कंगना रनौतच्या ‘तेजस’ आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. कंगना भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसून येईल. हा चित्रपट सर्वेश मेवारा दिग्दर्शित करत आहे. ‘तेजस’ चित्रपट सुरुवातीला २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. प्रदर्शनाची तारीख एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली आहे. तेजस चित्रपट आता २७ ऑक्टोबर रोजी तो थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तेजस या सिनेमाची गेल्या दोन वर्षांपासून बरीच चर्चा आहे. कंगनाचे एकामागून एक हिंदी चित्रपट दणाणून आपटत असताना ‘तेजस’चित्रपटाच्या कमाईबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

टीझरमध्ये कंगनाची एअरफोर्स पायलट म्हणून झलक पाहायला मिळते. यात कंगना तिच्या उड्डाणाची तयारी करताना दिसते. कंगना आकाशातून लढाऊ विमानातून होणाऱ्या युद्धात सहभागी होताना दिसते. टीझरमध्ये कंगना म्हणते, “आता रणांगणात लढाई व्हायला हवी. भारताने खूप क्रूरता सहन केली आहे. आता पावसाऐवजी आकाशातून आगीचा वर्षाव व्हायला हवा. जर तुम्ही माझ्या भारताला चिथावणी दिली तर आम्ही तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही.”


कंगनाने टीझरसह सिनेमाचे नवे पोस्टरही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले. यात कंगना समोरच्यावर हातात चाकू घेऊन धावताना दिसून येते, हेल्मेट घालून लढाऊ विमान सुरु करण्यापूर्वीची तयारी, युद्ध प्रसंगतील लढाऊ विमाने आदी प्रसंग दिसून येतात. कंगनाने याला कॅप्शन दिले,” जेव्हा देशाच्या संरक्षणावर प्रश्न उभे राहील त्यावेळी मी सर्व मर्यादा ओलांडेल.”

कंगना भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेतील तयारीबाबत निर्मात्यानी चांगलेच मार्केटिंग केले. पोस्टर आणि टीझर प्रदर्शनाअगोदरच कंगनानं स्वतःहूनच भूमिकेच्या तयारीसाठी आवश्यक गोष्टींच्या प्रशिक्षणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

हे ही वाचा 

‘या’ हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली… मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?

ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या आयुष्यावर चित्रपट? आमिर साकारणार भूमिका..

यापूर्वी, कंगना रणौतने तेजसच्या सेटवर वास्तविक जीवनातील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले होते. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, “आम्ही तेजस चित्रपटाचे शूटिंग करत असताना हवाई दलाचे अधिकारी/सैनिक विमानातून उतरले तेव्हा माझी हीरोगिरी पूर्ण फिकी पडली…सैनिकांना या आगामी चित्रपटाबद्दल आधीच माहिती होती आणि त्यांनी तो पाहण्याची उत्सुकता दाखवली… ही छोटीशी भेट अगदी आनंददायी आणि उत्साहवर्धक होती… जय हिंद.”

‘तेजस’ चित्रपट हवाई दलाचे पायलट तेजस गिलच्या उल्लेखनीय प्रवासाभोवती फिरतो. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्वरित एक्स या सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांची मते शेअर केली. तेजसच्या टीझरने नेटिझन्समध्ये फूट पाडली. काहिंना कंगना रनौतच्या अभिनय आणि वेषभूषा चांगली वाटली. इतरांना टीझर सामान्य आणि निस्तेज वाटला. सिनेमा समीक्षक आणि व्यापार तज्ज्ञ रमेश बाला यांच्या मतानुसार, “तेजसचा टीझर एक ठोस पंच आहे! भारतीय वायुसेनेच्या पायलेटच्या गणवेशात कंगना रानौत सुंदर दिसत आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी