27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजन२९ मार्चला येणार 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'

२९ मार्चला येणार ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’

‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे.नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले

‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.

चित्रपटाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे का गुन्हा आहे आणि हे नेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार, हे निश्चित!

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.’’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी