35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याचे समजले आहे. त्यानंतर त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्यांची प्रकृती लवकरता लवकर बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan) हे दोघंही स्ट्रिट प्रीमियर लीगच्या फायनल्सना गुरुवारी ठाण्यात उपस्थित होते. दादोजी कोंडदेव मैदान या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6 वाजता मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना (Amitabh Bachchan) दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांची अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. मात्र, का करण्यात आली हे अद्याप समजलेलं नाही.

दरम्यान अमिताभ यांनी स्वतः ट्विटरवर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ‘कायम कृतज्ञ…’ असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत त्यांची प्रकृतीची विचारपूस करताना दिसत आहेत.

अँजिओप्लास्टी कधी केली जाते?
एखाद्या रुग्णाला जर हृदयविकाराचा झटका आला तर अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयाच्या आर्टरीजमध्ये ब्लॉक तयार होतात, त्यामुळे रक्ताभिसरण क्रियेत अडथळे निर्माण होतात. अशा स्थितीत अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला जातो.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. वेगवेगळ्या पोस्ट करत बच्चन नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.  अनेकदा त्यांना सेटवर दुखापत झाली आहे. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना ते जखमी झाले होते. २०२२मध्ये ‘कौन बनेगा करोडपती १४’च्या शूटिंगवेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी