29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेट'तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही...', मुंबईच्या खेळाडूंची 'ती' पोस्ट चर्चेत

‘तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही…’, मुंबईच्या खेळाडूंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबईच्या संघाने विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक (Ranji Trophy 2024 )आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी करत अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. मात्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे धवल कुलकर्णीची(Dhawal Kulkarni ). हा सामना धवल कुलकर्णीचा(Dhawal Kulkarni ) अखेरचा सामना होता. त्याने या सामन्यानंतर निवृत्ती घेतली आहे. ३६ वर्षीय धवल १६ वर्षे मुंबईकडून खेळला. त्याच्या निवृत्तीबद्दल मुंबई संघातील खेळाडूंनी त्याला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईच्या(Ranji Trophy 2024 ) विजयानंतर धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni )भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु तरळले. संघातील सर्व खेळाडूंनी त्याला मिठी मारली. तर क्रिकेट चाहत्यांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. धवल कुलकर्णीने त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटच्या षटक टाकत १०वी विकेट घेतली आणि मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन संघ ठरला.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

विजयानंतर मुंबईच्या खेळाडूंनी धवलला(Dhawal Kulkarni ) मराठीतून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर आणि शम्स मुलानी धवलला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही…’, अशा कॅप्शननी ही पोस्ट बीसीसीआयने शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे.

35 वर्षांच्या धवलने 2007 मध्ये मुंबई संघातून रणजी ट्रॉफीत डेब्यू केला. त्याने 95 सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. धवलने या 157 डावांमध्ये 281विकेट्स घेतल्या. धवलने 15 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तसेच 1 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच धवलने 110 डावात 8 अर्धशतकांसह 1 हजार 793 धावा केल्या. धवलची 87 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या होण्याची शक्यता

मुंबईने शेवटचं रणजी जेतेपद (२०१५-१६) मध्ये पटकावलं होतं. त्या सामन्यातील ३ खेळाडू या सामन्यातही आहेत. श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णी. या तिन्ही खेळाडूंनी अंतिम सामन्यात मोठी भूमिका बजावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी