29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकच्ची पपई खाण्याचे फायदे...

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

प्रत्येकाला फळ खायला खूप आवडतात आणि प्रत्येक फळाचं काही ना काही चांगले गुणधर्म असतात पण तुम्ही कधी कच्ची  पपई खालाय का ? आणि कच्ची  पपई खाण्याचे फायदे माहितीय का ? तर आपण आज पाहूया कच्ची  पपई खाण्याचे फायदे आणि त्याचबरोबर पपईच्या बिया खाण्याचे  फायदे पपई आरोग्यासाठी एक खजिना  आहे. पपई मध्ये भरपूर प्रमाणात मैग्नीशियम, विटामिन सी, विटामिन ए, नियासिन, आणि फाइबर असे अनेक पोषक तत्व असतात.

प्रत्येकाला फळ खायला खूप आवडतात आणि प्रत्येक फळाचं काही ना काही चांगले गुणधर्म असतात (benefites of green papaya) पण तुम्ही कधी कच्ची  पपई खालाय का ? आणि कच्ची  पपई खाण्याचे फायदे माहितीय का ? तर आपण आज पाहूया कच्ची  पपई खाण्याचे फायदे आणि त्याचबरोबर पपईच्या बिया खाण्याचे  फायदे पपई आरोग्यासाठी एक खजिना  आहे. पपई मध्ये भरपूर प्रमाणात मैग्नीशियम, विटामिन सी, विटामिन ए, नियासिन, आणि फाइबर असे अनेक पोषक तत्व असतात. पपई मध्ये अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेंट पण असतात जी कैंसर पासून वाचवण्यासाठी मदत करतात. तसेच याच्यात पोटेशियम व फोलेट देखील असते जी  आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. कच्ची पपई महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या वेदनांना दूर करण्यासाठी कच्च्या पपईचे सेवन सेवन करावे. कच्ची पपई खल्याने प्रोस्टाग्लैंडीन आणि ऑक्सीटोसिन चा स्तर वाढतो. ज्यामुळे महिलांना मासिक पाळीच्या त्रासापासून आराम मिळतो. डायबिटीजच्या रुग्णांसाठी कच्ची पपई खूप फायदेशीर मानली जाते. कच्ची पपईचा रस किंवा भाजी खाल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रीत राहते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची पपई खाणे अत्यंत आवश्यक आहे. कच्ची पपईचे सेवन रोज केल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फाइबर मिळते, ज्यामुळे पचन प्रक्रिया व्यवस्थीत होते, वजन कमी करण्यासाठी मोलाचे कार्य करते, आणि बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो कच्च्या पपई मध्ये विटामिन ए, विटामिन बी आणि विटामिन सी भरपुर प्रमाणात असते. याचा नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर पपईच्या बिया खाल्याने  वजन आटोक्यात राहण्यास मदत होते . व रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करते पपईच्या बियांमध्ये पॅपिन नावाचे एन्जाइम असते त्यामुळे प्रथिने पचण्यास मदत होते . पपईच्या बियांमध्ये अँटी – प्यरोसिटिक गुणधर्म असतात ज्यामुळे पोटातील जंत कृमी कमी होण्यास मदत होते . त्याचबरोबर पपई फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्या सौंदर्यासाठी  देखील फायदेशीर आहे पपईच्या साली टाकून देण्यापेक्षा त्यांचा आपल्या सौंदर्यासाठी उपयोग करू शकता पपईच्या साली पासून फेस पॅक बनवता येतो त्याचबरोबर ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग उठतात त्यांनी देखील पपईच्या सालीचा उपयोग करावा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी