30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहनुमान जन्मोत्सवासाठी नाशिक सज्ज

हनुमान जन्मोत्सवासाठी नाशिक सज्ज

शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी आज ( मंगळवारी) हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी नाशिकसह जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये मोठा उत्साह असून शहरातून पारंपारिक मार्गावरुन सायंकाळी मिरवणूक काढली जाणार आहे. रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या त्रांबकेश्वर जवळील अंजनेरी पर्वतावरही जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी आज ( मंगळवारी) हनुमान जन्मोत्सव ( Hanuman jayanti ) सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी नाशिकसह जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये मोठा उत्साह असून शहरातून पारंपारिक मार्गावरुन सायंकाळी मिरवणूक काढली जाणार आहे. रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या त्रांबकेश्वर जवळील अंजनेरी पर्वतावरही जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.(Nashik gets ready for Hanuman Jayanti)

तसेच गाभारा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे. हनुमान भक्तांकडून तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे.
नाशिकरोड,सिडको, सातपूर आणि पंचवटीत हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.पंचवटीमधील पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये श्रींच्या मुर्तीला महाभिषेक व महाआरती करण्यात येईल. सामुहिक मारूती स्त्रोत्र पठण केले जाणार आहे. आगारटाकळी येथील गोमय हनुमान मंदिरातही भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय इतरही हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी केली गेली आहे.आगारटाकळी येथील गोमय हनुमान मंदिरातही भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय इतरही हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी केली गेली आहे.

अंजनेरी येथे महाआरती
रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी येथे जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंजनेरी जन्मस्थान संस्थेकडून यंदाच्या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. पहाटेच्या वेळी साधु- महंतांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीला महाभिषेक केले त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता साधु- महंत व भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसाचे पठण व महाआरती येईल. भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

अंजनेरीवर असे होणार धार्मिक कार्यक्रम

अंजनेरी येथे ध्वजारोहण
पहाटे ५ पासून साधू-महंतांच्या हस्ते महायज्ञ

दोन लाख भाविक करणार हनुमान चालिसा पठण

सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी महाआरती

हनुमान बीजमंत्र पठण

साधू-महंतांना भगवे वस्त्रदान

-भक्तांसाठी महाप्रसाद

स्वच्छता मोहीम राबविणार
महाआरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हनुमान जन्मस्थान संस्था व अंजनेरी ग्रामस्थांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक औषधोपचाराची सुविधा पुरविली जाणार आहे. तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी