31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमनोरंजनDeepika Padukone : जगातील सर्वात सुंदर 10 स्त्रियांमध्ये दिपीका पदुकोणचा समावेश! वाचा...

Deepika Padukone : जगातील सर्वात सुंदर 10 स्त्रियांमध्ये दिपीका पदुकोणचा समावेश! वाचा कोणत्या स्थानावर आहे ‘मस्तानी’

नुकत्याच समोर आलेल्या जगातील सर्वात 10 सुंदर महिल्यांच्या यादीत भारतीय सीनेसुष्टीतील मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोन हिचा सुद्धा समावेश आहे.

नुकत्याच समोर आलेल्या जगातील सर्वात 10 सुंदर महिल्यांच्या यादीत भारतीय सीनेसुष्टीतील मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोन हिचा सुद्धा समावेश आहे. ही यादि डॉक्टर ज्युलियन डी सिल्वा या शास्राज्ञने तयार केली आहे. त्याच्या नुसार सौंदर्य गोल्डन रेशोच्या सूत्राने मोजल जाते. यामध्ये, चेहऱ्याचे सौंदर्य मोजले जाते आणि 1.618 (Phi) सोबत तुलना केली जाते. अहवालानुसार, ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’, ज्याला phi म्हणूनही ओळखले जाते, ही एक गणितीय पद्धत आहे ज्यामध्ये शारीरिक परिपूर्णतेचे सूत्र लागू केले जाते. ह्या सूत्रानुसार दीपिका 91.22 टक्क्यांनी 9 वा क्रमांक पटकवला आहे.

हॉलिवूड अभिनेत्री जोडी कॉमर या यादीत प्रथम
या यादीत जोडी कोमरचे वर्णन जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून करण्यात आले आहे. 98.7 टक्के गुणांसह, ती परिपूर्ण आकार होण्यापासून केवळ 1.3 टक्के दूर आहे. जोडी सोबतच या यादीत गायिका आणि अभिनेत्री झेंडया दुसऱ्या, अमेरिकन मॉडेल बेला हदीद तिसर्‍या आणि अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री बियॉन्से चौथ्या क्रमांकावर आहेत. तसेच पाचव्या क्रमांकावर एरियाना ग्रांडे, सहाव्या क्रमांकावर टेलर स्विफ्ट आहे. अमेरिकन पॉप गायक जॉर्डन डन सातव्या क्रमांकावर आहे. किम कार्दशियनला आठवे आणि दीपिका पदुकोणला नववे स्थान मिळाले आहे. तर दक्षिण कोरियाची अभिनेत्री आणि मॉडेल होयोन जुंग हिला 10 वे स्थान मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : पाकिस्तानी शिष्टमंडळाला दाऊदविषयी प्रश्न विचारला असता पाकिस्तान चिडीचुप! व्हिडिओ व्हायरल

Corona New Varient : दिवाळीपूर्वी धोक्याची घंटा! कोरोनाच्या नव्या अन् अधिक धोकादायक प्रकाराचा रुग्ण पुण्यात सापडला

Asia Cup : आशिया चषक 2023 पाकिस्तानात? मोठी अपडेट आली समोर

ओम शांती ओम या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या दीपिकाने पुढे जाऊन बाजीराव मस्तानी, रामलीला, पदमावत, पिकू, ये जवानी हे दिवानी अशा अनेक बॉल्कबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं. 2018 मध्ये तिने अनेक चित्रपटान मध्ये तिचा सहकलाकार असलेल्या रणवीर सिंह सोबत लग्न केलं. तिच्या सौंदर्याची केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा केली जाते. अशातच दीपिका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिने टॉप 10 सुंदर महिलांमध्ये आपल स्थान निर्माण केलं.

दीपिका पदुकोणच्या अपकमिंग फिल्मस बद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सध्या एकापेक्षा एक चित्रपट आहेत. ‘पठाण’ या चित्रपटात ती बॉलिवूडचा किंग खान ‘शाहरुख खान’सोबत दिसणार आहे. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे. याशिवाय ती प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार असून हृतिक रोशनसोबत ती ‘फाइटर’ चित्रपटाचा देखील भाग आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी