29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनदिशा पटाणीचा 'फिटनेस मंत्रा' काय आहे?

दिशा पटाणीचा ‘फिटनेस मंत्रा’ काय आहे?

आपल्याकडे खरं तर माधुरी दीक्षित धक धक गर्ल म्हणून ओळखली जाते. त्यात आणखी एका सुंदर आणि गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीची भर पडली म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. ही अभिनेत्री आहे दिशा पटाणी. ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सप्टेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आणि दिशा पटाणी हा नवा चेहरा बॉलिवूडला मिळाला. त्यापूर्वी दिशा पटाणी काय करायची, ती थेट मुंबईत कशी आली, तिला काय बनायचं होतं, तिचं शिक्षण किती झालं, असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत असतील. पण आजमितीला ही धक धक गर्ल तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहे. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला, अशा प्रतिक्रिया तिला पाहून येतात. यावरून दिशा पटाणी काय चीज आहे, हे समजून जा!

मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये सहज वावरणारी दिशा पटाणी स्वत:ला कशी फिट ठेवते, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर आम्ही आता तुम्हाला फिटनेससाठी दिशा काय करते हे दाखवणार आहोत. या व्हिडीओतून तुम्हाला कळेल, फिटनेस राखण्यासाठी या अभिनेत्रींना किती मेहनत घ्यावी लागते.

तुम्हाला माहीत आहे का, दिशा पटाणी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी काय करत होती? तिने शिक्षण अर्धवट सोडलं आहे आणि ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात संधी मिळण्यापूर्वीू तिने २०१५ मध्ये तेलुगू चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली होती. अवघे पाचशे रुपये खिशात घेऊन मुंबईत पाऊल ठेवणाऱ्या या अभिनेत्रीने मॉडेलिंगमधून सुरुवात केली. त्यानंतर ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिला ब्रेक मिळाल्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. अशी ही दिशा पटाणी हॉट गर्ल म्हणून सर्वांना जास्त परिचित आहे. ती इतकी बिनधास्त आहे की, तिच्या सर्व हॉट अदा ती सोशल मीडियावर बेधडक शेअर करत असते. यातील एक अदा खास तुमच्यासाठी आम्ही शेअर करत आहोत.

तुम्ही दिशा पटाणीचे चाहते असाल तर नुसतं तिचं ग्लॅमर आणि तिला मिळणारी पब्लिसिटी पाहून खूश होऊ नका. तर त्यामागे त्यांची किती मेहनत असते, हे देखील पाहा. मुख्य म्हणजे स्वत:च्या प्रकृतीकडे म्हणजेच फिटनेसकडे कायम लक्ष द्यावं लागलं. शूटींगची वेळ कोणतीही असली तरी फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. तुमच्या आवडत्या अभिनेत्रीकडून एवढं नक्की शिकाच!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी