30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमनोरंजनझुंडचा 'डॉन' फिल्मफेअरमध्ये ठरला 'खिलाडी'; अंकुश गेडाम ठरला पदार्पणातील सर्वोतकृष्ट अभिनेता

झुंडचा ‘डॉन’ फिल्मफेअरमध्ये ठरला ‘खिलाडी’; अंकुश गेडाम ठरला पदार्पणातील सर्वोतकृष्ट अभिनेता

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर एक पोस्ट शेअर केली असून च्याहत्यांनी त्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्याला कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यंदाचा फिल्मफेअर अवार्ड सोहळा मुंबईत पार पडला, नागराज आणि त्याच्या टीमसाठी हा सोहळा संस्मरणीय ठरण्याचे कारण म्हणजे, त्याच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता अंकुश गेडाम हा फिल्मफेअर पुरस्काराचा मानकरी ठरला असून अंकुश गेडाम याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

यंदाचा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या सोहळ्यात यंदा अंकुश गेडाम याचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत नागराजने केलेला हा पहिलाच हिंदी चित्रपट असून या चित्रपटासाठी फिल्मफेअर सोहळ्यात अंकुश गेडामला गौरविण्यात आले आहे.

अंकुश गेडाम याला पुरस्कार मिळाल्यानंतर नागराज मंजुळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अंकुशचा फोटो पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे. अंकुशने झुंडमध्ये डॉन हे मुख्य पात्र साकारले होते. झोपडपट्टीतील मुलांमधील स्पिरीट ओळखून एक क्रिडा प्रशिक्षक (अमिताभ बच्चन) त्यांना खेळाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी धडपड करत आहे, ते या चित्रपटातून दाखविण्यात आले होते. अंकुश गेडामने या चित्रपटात फुटबॉलपटूची भुमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

जिया खान आत्महत्या प्रकरण; सूरज पंचोली याची निर्दोष मुक्तता

पोलीस अधिकाऱ्यावर गुंडांचा हल्ला

Filmfare Awards 2023: फिल्म फेअरमध्ये आलियाचा बोलबाला; ‘गंगूबाई काठियावाडी’ला तब्बल 10 पुरस्कार

अंकुश गेडामला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. झोपडपट्टीत वाढलेल्या अंकुशला नागराज मंजुळेने बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत झळकविले. त्याच्या अभिनयाचे त्यावेळी सर्वस्तरातून कौतुक झाले होते. आज फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अंकुशने या पुरस्कारावर नाव कोरले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी