38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांना जोर का झटका ; शिवसेना भवन आणि संपत्तीवर हक्क...

एकनाथ शिंदे यांना जोर का झटका ; शिवसेना भवन आणि संपत्तीवर हक्क सांगणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली..!

'शिवसेना' असे पक्षाचे मुळनाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यामुळे शिंदे यांनाच शिवसेनेचे मुख्य नेते मानून त्यांच्या पक्षाला शिवसेना भवन आणि पक्षनिधी सोपविला जावा, अशी मागणी करणारी एका वकिलाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.

‘शिवसेना’ असे पक्षाचे मुळनाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यामुळे शिंदे यांनाच शिवसेनेचे मुख्य नेते मानून त्यांच्या पक्षाला शिवसेना भवन आणि पक्षनिधी सोपविला जावा, अशी मागणी करणारी एका वकिलाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.

ऍड. आशीष गिरी यांनी दाखल केलेल्या आपल्या याचिकेत एकनाथ शिंदें यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवल्यास शिवसेना भवन, पक्षाचा संपूर्ण निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या, अशी मागणी केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला कडक शब्दात फटकारले.
शिवसेना भवन आणि पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावी, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा परखड सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला विचारला.

ऍड. आशीष गिरी यांनी दाखल केलेल्या आपल्या याचिकेत एकनाथ शिंदें यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवल्यास शिवसेना भवन, पक्षाचा संपूर्ण निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या, अशी मागणी केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला कडक शब्दात फटकारले. शिवसेना भवन आणि पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा परखड सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला विचारला.

आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून, माझ्या याचिकेचा एकनाथ शिंदे गटाशी काहीही संबंध नाही, असे ऍड. गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. एक वकील आणि मतदार या नात्याने आपण ही हस्तक्षेप याचिका दाखल केली असल्याचेही ऍड. गिरी यांनी म्हटले.

वकील म्हणून मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर शिवसेनेची सर्व संपत्ती त्यांना दिली जावी, असेही गिरी यांनी याचिकेत म्हटले होते. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्यास शिवसेनेची मालमत्ता त्यांना दिली जावी, अशी मागणी याचिकेत नमूद होती. आता सर्व गोष्टींवर निर्बंध लादले जावे, असेही याचिकेत म्हटले होते.

हे सुध्दा वाचा :

शरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना मिळ्णार संधी

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

दिल्लीश्वरांच्या मर्जीमुळे मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी ?

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिककर्त्या वकिलाला अशी मागणी करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नसून एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवन आणि पक्षाची मालमत्ता बहाल करावी, हे सांगणारे तुम्ही कोण? अशा कडक शब्दात फटकारून ही याचिका फेटाळून लावली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी