टीम लय भारी
मनाली : २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदार एक प्रेम कथा’ चित्रपटाने सिनेमागृहात सुपर डुपर कमाई केली होती. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटातील भूमिका तारा सिंग आणि सकीना यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. आता याच ‘गद्दार’ चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. अभिनेता सनी देओलने आपल्या नव्या सेटवरची झलक आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे (Gaddar 2: Sunny Deol shared a glimpse of the new set).
गद्दार २ चित्रपटाची शूटिंग हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे सुरु आहे. सनी देओलने आपल्या नव्या सेटवर चहा पितानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सनी सोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा देखील दिसत आहेत. सनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ” वाचन सत्र आणि थंड पर्वत वारा व हॅशटॅग गद्दार २ हॅशटॅग मनाली अशा आशयाचे कॅप्शन सनीने फोटोखाली लिहिले आहेत.
धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू
Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल
View this post on Instagram
त्याचबरोबर अमिषा पटेल हिने देखील हाच फोटो आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला होता. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ‘गद्दार २’ या चित्रपटाची घोषणा केली होती.
कुत्र्यांसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल; नेटकरी म्हणाले…
Gadar 2: क्या शुरू हुई Sunny Deol की इस फिल्म शूटिंग, सर्द हवाओं के बीच आग तापते सामने आई फोटो
पहिल्या भागात एक हिंदू सिख मुलगा एका पाकिस्तानी मुसलमान असलेल्या मुलीच्या प्रेमात कसा पडतो हे दाखवण्यात आले होते. तारा सिंग आणि सकीना यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी यात दाखवण्यात आली होती.