32 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमुंबईविक्रोळीचे महापालिका रूग्णालय सुरू कधी होणार?

विक्रोळीचे महापालिका रूग्णालय सुरू कधी होणार?

विक्रोळी येथील रहिवाशांना आरोग्य सुविधा देणारे 100 खाटांचे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय जीर्ण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. महानगरपालिकेने जागेवर तात्पुरता बाह्यरुग्ण विभाग सुविधा उभारली, तर आंतररुग्ण सेवा जवळच्या महापालिका संचालित आंबेडकर प्रसूती रुग्णालयात हलवण्यात आल्या. मे महिन्यात स्थानिकांनी केलेल्या उपोषण नंतर या भागात 100 ते 150 खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार करत आहोत, असे महापालिकेने आश्वासन दिले. पण ते काही पूर्ण झाले नाही. त्यामुळे हे रुग्णालय पुन्हा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे.

विक्रोळी येथील रहिवासी 2018 मध्ये या भागातील एकमेव रुग्णालय बंद झाल्यानंतर नवीन रुग्णालय बांधण्यास झालेल्या विलंबाचा स्थानिक निषेध करत आहेत. बीएमसीने तात्पुरते रुग्णालय उभारण्याची योजना आखली होती, परंतु त्यासाठी कंत्राटदार शोधूनही मिळत नाही त्यामुळे हे रुग्णालय काही सुरू झाले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना सध्या आपत्कालीन उपचारांसाठी इतर रुग्णालयात जावे लागत आहे. वास्तविक पाहता हे रुग्णालय जुने झाल्यावर महापालिकेने त्याची दुरुस्ती केली पाहिजे होती वा नवीन रुग्णालय निर्माण केले पाहिजे होते. पण गेल्या सहा वर्षात महापालिकेने काहीच केले नसल्याने स्थानिक जनतेत रोष आहे.

दरम्यान महापालिका प्रशासनाने ऑगस्टमध्ये महापालिकेने भाडेतत्वावर सामान्य मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल भाड्याने देण्यासाठी 54 कोटींचे स्वारस्य (टेंडर) काढले. आम्ही पाच किमी आत 100 ते 150 खाटांचे हॉस्पिटल शोधत होतो, ज्यामध्ये किमान 20 आयसीयू बेड आणि 10 एनआयसीयू बेड असतील, असे सांगितले. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या नवीन रुग्णालयाच्या बांधकामाचे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागेल. मात्र, तात्पुरत्या रूग्णालयाची निविदा निघाल्यानंतर एकच निविदाकार पुढे आला होता. अधिकाऱ्याने सांगितले, आम्ही निविदेची मुदत सहा वेळा वाढवली आहे. “कन्नमवार नगरमध्ये 160 खाटांचे शुश्रुषा हॉस्पिटल चालवणाऱ्या फक्त एका ट्रस्टने स्वारस्य दाखवले. तथापि, आम्ही देऊ करत असलेला दर स्वीकारण्यास ते तयार नाहीत.

हे ही वाचा 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड रुग्णालयातील घटनेनंतर आता घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 मृत्यू…

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात आता ‘एवढी’ कपात…

या परिसरात आरोग्य सेवेची मागणी करणारे स्थानिक रहिवासी आणि मे महिन्यात झालेल्या उपोषणाचा भाग घेतलेले मिलिंद परब यांनी सांगितले की, परिसरातील परिस्थिती अतिशय वाईट होती. सरकारकडून आश्वासन असूनही, बीएमसी तात्पुरते रुग्णालय सुरू करू शकले नाही आणि केवळ सौदेबाजी आणि दर वाढविण्यात व्यस्त आहे, आम्हाला सांगण्यात आले होते की रुग्णालय ऑगस्टपर्यंत सुरू होईल परंतु तसे झाले नाही. आता अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या कॉलला उत्तर देणे बंद केले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी एका महिलेला प्रसूती झाल्यानंतर जवळच्या आंबेडकर प्रसूतीगृहात न्यावे लागले. प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात रात्री डॉक्टर नव्हते. त्यानंतर तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण विक्रोळी-भांडुप पट्ट्यात एकही रुग्णालय नाही. रहिवासी आंबेडकर हॉस्पिटलमध्ये गेले तरी त्यांना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते, असेही परब यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी