29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनजान्हवी कपूर अन् तिरुमला मंदिराचं आहे खास कनेक्शन; अभिनेत्रीनेच केलाय खुलासा

जान्हवी कपूर अन् तिरुमला मंदिराचं आहे खास कनेक्शन; अभिनेत्रीनेच केलाय खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत असते सध्या ती कोणत्या चित्रपटामुळं नव्हे तर तिरुमला मंदिरामुळं चर्चेत आली आहे. अनेकदा जान्हवी (Janhvi Kapoor) ही तिरुमला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळते. त्याचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळं तिच्या चाहत्यांना जान्हवी ही तिरुमला मंदिरात का जाते? असा प्रश्न उपस्थित होत असतो. दरम्यान, अभिनेत्रीनं स्वतःच यासंदर्भात खुलासा केला आहे.(why janhvi kapoor visi tirumala temple)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत असते सध्या ती कोणत्या चित्रपटामुळं नव्हे तर तिरुमला मंदिरामुळं चर्चेत आली आहे. अनेकदा जान्हवी (Janhvi Kapoor) ही तिरुमला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळते. त्याचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळं तिच्या चाहत्यांना जान्हवी ही तिरुमला मंदिरात का जाते? असा प्रश्न उपस्थित होत असतो. दरम्यान, अभिनेत्रीनं स्वतःच यासंदर्भात खुलासा केला आहे.(janhvi kapoor why visit tirumala temple)

जान्हवी बॉलीवूडनंतर आता तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘देवारा’ या तेलुगु चित्रपटातून जान्हवी चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. दरम्यान, जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती गुडघे टेकवत संपूर्ण पायऱ्या चढत मंदिरात जाताना दिसत आहे. असं करण्यामागे जान्हवीनं खुलासादेखील केला आहे.

काय म्हणाली जान्हवी?

“मला तिथे जायला खूप आवडतं कारण तिरुमालाशी माझं एक विशेष आध्यात्मिक संबंध आहे. मी यापूर्वी 50 वेळा जाऊन आले आहे आणि आता जेव्हापण मी तिथे जाते तेव्हा माझ्यासोबत काही चांगलं होतं.” जान्हवी जेव्हा छोटी होती तेव्हा श्रीदेवी तिला तिरुमाला मंदिरात घेऊन जायची. असही तिनं यावेळी सांगितलं.

जान्हवी कपूर यावर्षी तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजेच 6 मार्च रोजी तिरुमाला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. तिनं तिचा वाढदिवसदेखील तिथंच साजरा केला. त्यानिमित्तानं तिच्यासोबत कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि मित्र ऑरीनं देखील हजेरी लावली होती. ऑरीनं त्याचा एक व्लॉग देखील केला आहे. या व्लॉगमध्ये त्या तिघांनी संध्याकाळच्या वेळी 3000 पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आणि ते मध्य रात्री वरती पोहोचले.

जान्हवी कपूर नुकतीच तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या हैदराबादच्या घरी गेली होती. त्या दोघांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की आता “#RC16 ची प्रतिक्षेत आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी