35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयठाकरे गटाच्या बड्या नेत्याला तिकीट मिळताच ED ने बजावले समन्स

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला तिकीट मिळताच ED ने बजावले समन्स

खिचडी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar ) यांना समन्स बजावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून महाराष्ट्रात रिंगणात उतरवण्यात येणाऱ्या 17 उमेदवारांमध्ये कीर्तिकर यांचा समावेश आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा करताच गटातील बड्या नेत्याला ईडीने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. सुमारे पाच तास त्यांची चौकशी झाली. शिवसेनेतील फुटीनंतर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर त्यांचे पूत्र अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटात आहेत.

नेमकं प्रकरण काय?

लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता.

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; बड्या नेत्यांना दिली संधी

या प्रकरणात माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांची देखील चौकशी झाली होती. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सूरज चव्हाण यांना अटकही करण्यात आली होती. आता या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी