31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमनोरंजनऐन निवडणुकीत 'संघा'वर वेब सीरिज

ऐन निवडणुकीत ‘संघा’वर वेब सीरिज

नुकतेच विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरआरएस) 98 वा वर्धापनदिन साजरा झाला. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये स्थापन केलेल्या आरआरएसचा 2025 साली शतकमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. आता संघाचा इतक्या वर्षांचा इतिहास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून संघाची आतापर्यंतची वाटचाल वेब सिरिजच्या स्वरूपात लोकांना पाहता येणार आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली असून वेब सिरीजचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. ‘वन नेशन’ असे या वेब सिरीजचे नाव असून एक-दोन नव्हे तर तब्बल सहा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक या वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.

मंगळवारी, (24 ऑक्टोबर) विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यादिवशी, आरआरएसच्या आतापर्यंतच्या प्रवासावर आधारित ‘वन नेशन’ या वेब सिरीजचे पोस्टर लॉंच करण्यात आले. या वेब सिरिजमधून संघाची आतापर्यंतची वाटचाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या वेब सिरीजचे दिग्दर्शन एक-दोन नव्हे तर तब्बल 6 दिग्दर्शक करणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शकांमध्ये विवेक अग्निहोत्री, प्रियदर्शन, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यु मंथन, मंजू बोरा आणि संजय पुरन सिंह चौहान यांचा समावेश आहे.


या वेब सिरीजची घोषणा करताना निर्मात्यांनी वेब सिरीजचे पोस्टरही रिलीज केले. या वेबसिरीजच्या पोस्टरमध्ये एक तरुण संघाचा गणवेश घालून पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. या सिरीजची घोषणा करताना निर्माते म्हणाले, “या वेबसिरीजच्या माध्यमातून आरआरएसबद्दल लोकांना जास्त माहिती मिळेल. आर आर एस चे देशासाठीचे योगदान आधोरेखित केले जाईल. देशाची एकता आणि अखंडता वाढण्यासाठी या वेब सिरीजचा उपयोग होईल.”

हे ही वाचा 

पिक्चर सलमानचा चर्चा इम्रान हाश्मीची!

अक्षय कुमारची स्कुटीवर हैदराबादची सफर! सहप्रवाशाला पाहून फॅन्स चक्रावले!

‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! ‘हा’ साकारतोय गडकरींची प्रमुख भुमिका

वेब सिरीजचे पोस्टर जरी रिलीज करण्यात आले असले तरी अद्याप यात कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत, हे स्पष्ट झाले नाही. तसेच या वेब सिरीजच्या प्रदर्शनाची तारीखही अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही आहे. त्यामुळे, आरआरएसच्या शताब्दी वर्षामध्ये 2025 साली ही वेब सिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

आगामी 2024 लोकसभा निवडणुकांआधी ही वेब सीरिज रिलीज होणार असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधीसुद्धा, पीएम नरेंद्र मोदी, द कश्मीर फाइल्स आणि द केरला स्टोरी यांसारखे चित्रपट देशातील महत्त्वाच्या निवडणुकींच्या आधी प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांना भाजप कार्यकर्त्यांकडून भरपूर प्रोत्साहन मिळाले होते. त्यामुळे, ही वेब सिरीजही आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ‘वन नेशन’ वेब सिरीजलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी