28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण, अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण, अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. राज्य सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटमचा अवधि पूर्ण झाल्याने आजपासून बुधवार, (24 ऑक्टोबर) पुन्हा साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये केलेल्या लक्षणिक आमरण उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षणाबाबतीत तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला होता. पण, दिलेल्या वेळेत राज्य सरकारने तोडगा न काढल्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी, राजकीय नेत्यांना अंतरवाली सराटी गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जरांगे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटनंतरही मराठा आरक्षणप्रश्नी अद्याप तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, (23 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन केले होते. आता, मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “आज २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार आहे. नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याच्या आश्वासनावर जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली असेल तर ती चांगलीच बाब आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. कारण ते कोर्टात टिकणार नाही,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे ही वाचा 

मराठ्यांना आरक्षण देणारच -एकनाथ शिंदेंचा निर्धार; भर भाषणात मंच सोडून शिवरायांची शपथ

50 खोक्यांचे आरोप करणाऱ्यांनीच 50 कोटींची मागणी केली; मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट

फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, असे का म्हणाल्या सुषमा अंधारे…

जरांगे पाटील पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला आणखी किती वेळ द्यायचा. आरक्षणासाठी लागणारे सर्व निकष आम्ही पूर्ण केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाल मान दिला आहे. आता त्यांनी मराठ्यांच्या शब्दाचा सन्मान करावा. सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी आरक्षाचा निर्णय या रात्रीत घ्यावा, अन्यथा उद्यापासून आम्ही लढायला सज्ज आहोत,” असा इशारा त्यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी