27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनप्राजक्ता माळीला अध्यात्माची ओढ, अचानक देवदर्शनाचा संकल्प कशासाठी?

प्राजक्ता माळीला अध्यात्माची ओढ, अचानक देवदर्शनाचा संकल्प कशासाठी?

प्राजक्ता माळी हिला तुम्ही ओळखता काय, असा प्रश्न कुणी विचारला तर लोक वेड्यात काढलील. कदाचित या प्रश्नामुळे तिचे चाहते दुखावलेही जातील. असो, थोडी गंमत केली तुमची. तर अशीही नटखट प्राजक्ता कधी इथे, तर कधी तिथे अशी फुलपाखरासारखी उडत असते. आठवड्यापूर्वी ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सहभागी झाली होती. त्याची चर्चा संपते न संपते तोच आता दुसरी चर्चा सुरू झाली आहे. अहो कसली चर्चा म्हणून काय विचारता? प्राजक्तानं देवीकडे मागणं मागितलंय. आता कसलं मागणं मागितलंय हे मीच सांगायचं का राव? अहो २३ ऑक्टोबर रोजी ती नवरात्र उत्सवाच्या काळात अंबेजोगाईला गेली होती आणि तिथं योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. तिनं देवीजवळ मोठी मागणी केली आहे.

प्राजक्तानं योगेश्वरी देवीला गाऱ्हाणं घालताना ‘अंबे तूज वाचून कोण पुरवील आशा…’ असं म्हटलं. आता तिच्या आशा काय आहेत, याची चाहूल लागल्यामुळे म्हणा प्राजक्ताच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दिसू लागली आहे. सर्वांची लाडकी अँकर आणि अभिनेत्री प्राजक्तानं देवीकडे असं काय मागितलं हे लवकरच कळेल, अशी अपेक्षा करूया

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

आता हे कमी म्हणून की काय प्राजक्तानं येत्या वर्षात १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करण्याचा संकल्प सोडला आहे. आणि २३ ऑक्टोबरपासून याची सुरुवात महाराष्ट्रातल्या परळी वैजनाथपासून केली आहे. तिची अशी काय मागणी आहे की ज्यासाठी ती १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करणार आहे, हे तो ज्योतिर्लिगच जाणो. मात्र, देवीच्या दर्शनानंतर प्राजक्ताला देवाच्या दर्शनाची आस लागलीय एवढं नक्की. म्हटलं, समजनेवालों को इशाराही काफी हैं!

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

आता थांबा कारण ज्योतिर्लिंगाची यात्रा सुरू केल्यानंतर प्राजक्ताने जीवन जगण्याची कलादेखील अवगत केलीय. अहो म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊडेंशनचा गुरुपूजा कोर्स तिनं पूर्ण केला आहे आणि तोही श्री श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळुरूमधील आश्रमात. सोशल मीडियावर तिनं याचा फोटोदेखील शेअर केला आहे. प्राजक्ता लिहिते, तब्बल २२ देश आणि देशभरातून ६३० जण यात सहभागी झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आता एवढं सगळं पाहिल्यानंतर पहिला प्रश्न उपस्थित होतो तो प्राजक्ता अध्यात्मात तर रमणार नाही ना?

पण नाही, रसिकांचं तिच्यावर इतकं प्रेम आहे की, ती जगात कुठेही गेली तर परत आपल्याकडे परत येणार आणि म्हणणार नमस्कार मंडुळी…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी