29 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरमनोरंजनरितेशच्या स्वप्नात लग्नानंतरही जिनिलिया... पाहा गमतीशीर व्हिडिओ

रितेशच्या स्वप्नात लग्नानंतरही जिनिलिया… पाहा गमतीशीर व्हिडिओ

नेत्वा धुरी, मुंबई: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या वेड या चित्रपटानं मराठी सिनेमासृष्टीचा चेहरामोहराच बदलला. दोघांच्या आगामी प्रकल्पाबद्दल चाहत्यांना उत्सुकता असतानाच रितेश आणि जिनिलियानं नुकताच नवा विनोदी रील इंस्टाग्रामवर शेअर केला. लग्नानंतर कोणत्याही पुरुषाच्या स्वप्नात बायको येतच नाही, अशी कबुली रितेशनं दिली. रितेश या कबुलीवर जिनिलियानं केवळ एक नजर नवऱ्यावर फिरवली. बायकोची वक्रदृष्टी पडतात रितेशनं स्वतःला आवरलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आपल्याच गाडीत बसून रितेश आणि जिनिलियानं नवा रील बनवला. पुरुषांच्या स्वप्नात बायको कधीच येत नाही, इतिहास याबद्दल साक्ष देतो असं रितेशनं कॅमेऱ्यात पाहून सांगितलं. बाजूच्या सीटवर बसलेल्या जेनेलियाना नजर फिरवताच त्यानं स्वतःची बाजू सावरली. वैद्यानिक संशोधन सांगतो, असं सांगत रितेशनं गुगली टाकली.

हे ही वाचा 

दिवंगत अभिनेता रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच बोलला गश्मीर

डिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं… इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

सनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे टाकत कमावले इतके कोटी!

अमिताभ बच्चन समोर बसून कौन बनेगा करोडपती बघण्याच तुमच स्वप्न होणार पूर्ण.. जाणून घ्या कसे?

रितेश आणि जिनिलिया आपल्या विनोदाच्या अचूक वेळेसाठी ओळखले जातात. जिनिलिया आणि रितेशने 2012 साली लग्नगाठ बांधली. जिनिलीयानं दोन मुलांच्या सांभाळासाठी दहा वर्ष चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. मात्र गेल्या वर्षी दिसेंबर महिन्यात तिने मराठी चित्रपट वेडमधून कमबेक केलं. जिनिलीया आणि रितेश यांना रियान आणि राहील अशी दोन मुले आहेत. पापाराजीनसमोर दोघंही नम्रतेने नमस्कार करतात. जिनिलीया आणि रितेश यांनी मुलांना चांगले संस्कार दिल्यानं सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आकाश ठोसर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी