29 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमनोरंजनसनी देओल-अमिषा पटेलच्या आयुष्यात भाग्योदय; गदर 2 ची 500 कोटींची कमाई

सनी देओल-अमिषा पटेलच्या आयुष्यात भाग्योदय; गदर 2 ची 500 कोटींची कमाई

अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या “गदर२’ या सिनेमानं ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार तज्ञ तरण आदर्श यांनी ‘एक्स’ (ट्विटर) सोशल माध्यमातून ही माहिती दिली. ‘गदर२’या चित्रपटामुळे कोरोनाकाळापासून भारतीय सिनेमाचा थंडावलेला बिजनेस वेगळ्या उंचीवर येऊन ठेपला आहे.

गदर2 ने विकेंडपर्यंत ४८२ कोटींहून अधिक कमाई केली होती. चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर शनिवारी अभिनेता सनी देओल यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी मोठी पार्टी आयोजित केली होती. गेल्याच ‘गदर2’ सिनेमा ५०० कोटींची कमाई करणार, हे जवळपास निश्चित झाले होते. ‘गदर-एक प्रेम कथा’ या २००१ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. भारताच्या फाळणी दरम्यान हिंदू तारासिंग मुस्लिम सकीनाची प्रेम कहाणी सर्वांच्या पसंतीस उतरली होती.

तब्बल २३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ‘गदर2’ प्रदर्शित झाला. ११ ऑगस्ट रोजी ‘गदर२’ प्रदर्शित झाला होता. तीन दिवसातच ‘गदर२’ने १२२ कोटी रुपये कमावले. सिनेमा शंभर कोटी पार करतात दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मोठया पार्टीचे आयोजन केले होते.’गदर-एक प्रेम कथा’ सिनेमा नंतर दोघांचा एकही चित्रपट फारसा चालला नाही. ‘गदर२’मुळे सनी देओल आणि अमिषा पटेल यांचे करिअर पुन्हा बहरले. दोघांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल यांना एकत्रित साईन करण्यासाठी निर्मात्यांच्या आता रांगा लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा 
जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा देशपातळीवर गौरव; शिक्षकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

चित्रपट व्यापार तज्ञ तरण आदर्श यांनी दोघेही पुन्हा एका नव्या चित्रपटात दिसू शकतात अशी हिंट दिली आहे. दोघांना आतापर्यंत कोणकोणत्या निर्मात्यांनी संपर्क केलाय, सोबत बोलणी अंतिम टप्प्यात सुरू आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. खुद्द सनी देओल आणि अमिषा पटेल यांनीही याबाबतीत मौन बाळगलं आहे. दोघेही लवकरच नव्या चित्रपटाची घोषणा करतील, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी