28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeएज्युकेशनमहाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा देशपातळीवर गौरव; शिक्षकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा देशपातळीवर गौरव; शिक्षकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे शिक्षक ते आयआयटीमध्ये शिकविणारे प्रोफेसर अशा राज्यातील पाच शिक्षकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. देशपातळीवर त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेतल्याने राज्याची मान उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे. शालेय शिक्षणात गुणवत्तेसाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी पद्धतीने वापर केल्याबद्दल या शिक्षकांचा आज गौरव करण्यात आला. प्रमाणपत्र, 50 हजार रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शैक्षणिक मोबाईल अॅप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल गांजळे, उच्च व्हीजेटीआय मुंबईतील केशव सांगळे, आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील (धुळे) डॉ. चंद्रगौडा पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच मुंबईतील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिेदशक स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

मृणाल गांजाळे
भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून मृणाल गांजाळे-शिंदे या एकमेव शिक्षिकेची शालेय विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांना यापूर्वी २०१९ सालचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार व २०२२ सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

डॉ. राघवन बी सुनोज
प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपुरमचे आणि आयआयटी बॉम्बेचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्र मध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर कडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. वर्ष 2019 च्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

प्रो. केशव सांगळे
प्रो. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिंबधन विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षण केल्याबद्दल 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा 
तरुणांनो उद्योजक व्हायचे आहे, ‘ही’ योजना आहे खास तुमच्यासाठी !
खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती
मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा- प्रकाश आंबेडकर

डॉ. चंद्रगौडा पाटील
डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्चतर शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापर यासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वाती देशमुख
कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत, श्रीमती स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजतागायत 500 हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी