29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनलग्नाच्या चर्चेत तापसी बॉयफ्रेंड मॅथियासच्या रंगात रंगली; पाहा फोटो

लग्नाच्या चर्चेत तापसी बॉयफ्रेंड मॅथियासच्या रंगात रंगली; पाहा फोटो

एकिकडं अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu ) हिनं गुपचुप लग्न उरकल्याची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडं तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड मॅशियससोबत होळी खेळल्याचे फोटो समोर आले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते तिला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, अद्याप तापसीनं याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

एकिकडं अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu ) हिनं गुपचुप लग्न उरकल्याची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडं तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड मॅशियससोबत होळी खेळल्याचे फोटो समोर आले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते तिला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, अद्याप तापसीनं याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

तापसी आणि माजी ओलंपिक पदक विजेता मॅथियास बोनं 23 मार्च रोजी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-परिवारासमोर सप्तपदी घेतल्या असल्याची चर्चा सुरु आहे. 20 मार्चपासून तिच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. त्या दोघांनाही मीडियाचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचं नाही आहे त्यामुळे त्यांनी गुपचुप पद्धतीनं लग्नाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे बोललं जात आहे.

आलिशान घर, गाड्या अन्… कंगना रणौत आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण

दरम्यान, तापसीचे होळीचे फोटो समोर आले आहेत. ज्यात बॉयफ्रेंड मॅशियसदेखील दिसत आहे. तापसीचा मित्र अभिलाष थापलियालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळीच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोत तापसीने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तिच्या भांगमध्ये गुलाल भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं तिच्या लग्नाच्या चर्चेनं जोर धरला आहे.

तापसी पन्नू आणि बॅडमिन्टन खेळाडू मॅथियास बो जवळपास १० वर्ष झाले रिलेशनशिपमध्ये आहेत. तापसी पन्नू आणि मॅथियास पहिल्यांदा 2013 मध्ये इंडियन बॅडमिन्टर लीगच्या उद्घाटन कार्यक्रमात भेटले होते. एका मुलाखतीदरम्यान, तापसीनं ‘मॅथियासला भेटल्यानंतर मला कळले की तो किती शांत आणि समजूतदार व्यक्ती आहे. परिपक्वता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मॅथियास एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहे. जेव्हा मी त्यांच्यासोबत राहते तेव्हा मला खूप शांत आणि सुरक्षित वाटते. अशी भावना व्यक्त केली होती.

कंगनाला घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू; पणजोबांनी काँग्रेसकडून जिंकली होती निवडणूक

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ती ‘फिर आई हसीन दिलरुबा’, ‘वो लड़की है कहां’ आणि ‘खेल खेल में’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी