मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर (Sameer Khakhar) यांचे आज (15 मार्च) वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. दूरदर्शनवरील प्रसिद्ध ‘नुक्कड’ मालिकेत त्यांनी ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारून ते घराघरात पोहोचले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना बोरिवली येथील एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. समीर खक्कर यांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते.
ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला त्यांचे भाऊ गणेश खक्कर यांनी दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, काल (मंगळवार) सकाळी त्यांना श्वासोच्छवास घेण्यात त्रास जाणवू लागला. आम्ही डॉक्टरांना बोलावले. यावेळी त्यांनी आम्हाला त्यांना रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आणि आज पहाटे 4.30 वाजता त्यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते, ” अशी माहिती गणेश यांनी दिली.

डीडी मेट्रो वरील ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेतही समीर यांनी चित्रपट दिग्दर्शक टोटो ची भूमिका बजावली होती. या शिवाय त्यांनी ‘संजीवनी’ ‘हंसी तो फंसी ‘ ‘जय हो’ ‘पटेल की पंजाबी शादी’ ‘पुष्पक’, ‘शहंशाह’, ‘रखवाले’ ‘राजा बाबू’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

हे सुद्धा वाचा :
‘आज सकाळी उठले आणि…’ आईच्या निधनानंतर माधुरीची भावुक पोस्ट
सिनेसृष्टीवर शोककळा: प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड