27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनकान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 'या' तीन मराठी चित्रपटांची निवड

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.'जिप्सी','भेरा' तसेच मनोज शिंदे दिग्दर्शित 'वल्ली' या तीन चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. या तीन चित्रपटांविषयी जाणून घेऊयात. मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी तीन मराठी चित्रपटांची निवड (Three Marathi films selected) करण्यात आली आहे.’जिप्सी’,’भेरा’ तसेच मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. या तीन चित्रपटांविषयी जाणून घेऊयात. मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes Film Festival)  तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.(‘Ya’ for the Cannes Film Festival Three Marathi films selected)

फेस्टिव्हलमधील फिल्म मार्केटसाठी शशी खंदारे यांनी दिग्दर्शित केलेला ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘भेरा’ तसेच मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी याविषयी माहिती दिली आहे. फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान 77 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.  यावर्षी 23 चित्रपट फेस्टिव्हलसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तीन चित्रपटांची निवड झाली आहे.  या समितीने एकमताने तीन मराठी चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड केली आहे. या तीन चित्रपटांपैकी ‘जिप्सी’ या चित्रपटाची निर्मिती ‘बोलपट’ निर्मिती संस्थेने केली आहे. ‘वैजप्रभा चित्र निर्मिती’ या संस्थेने ‘भेरा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ‘वल्ली’ या चित्रपटाची निर्मिती ‘स्पेसटाइम एंटरटेंमेंट’ या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे.

भेरा (Bhera)
‘भेरा’ ही कोरोना काळातली कोकणातल्या 2 निष्पाप जीवांची कथा आहे. यात गावच्या वस्तीपासून लांब एकटी राहणारी अनिबाई आहे. ती मुलाची म्हणजेच सुरेशची वाट पाहत आहे. तिला अपेंडिपें क्सचा त्रास आहे. तिच्यासोबत जन्मतःच मूक बधीर असणारा विष्णू आहे. अनाथ विष्णू मामाच्या घरी गुलामासारखा राहतो. अनिबाईचा ठावठिकाणा नसल्याने सुरेशची वाट पाहणारा विष्णू बिथरतो. गावचे सरपंच सुरेशच्या अस्थी घेऊन अनिबाईच्या घरी येतात आणि त्या अस्थी विष्णूकडे सुपूर्तकरतात. मित्र गेल्याने विष्णू दुः खी होतो.

जिप्सी (Gypsy)
‘जिप्सी’ ही दिशाहीनपणे भटकणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. ‘जोत्या’ या लहान मुलाला रोज भीक मागावी लागत आहे. भीकेत मिळालेले खराब आणि शिळे अन्न त्याला खावे लागत आहे. त्यामुळे त्याला ताज्या आणि गरम पदार्थांविषयी कुतूहल वाटत आहे. ताजे आणि गरम पदार्थ खायला मिळत नसल्याने तो वासावर स्वतःचे समाधान करत आहे. तर दुसऱ्या बाजूला गरोदरपणातही त्याच्या आईला भटकावे लागत आहे. तिचा एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी संघर्ष चालू आहे. पुढे जोत्या एका पदार्थाच्या वासामुळे आकर्षिक होतो. हा वास त्याचा आयुष्यात बदल घडवत

वल्ली (Valli)
या चित्रपटाच्या कथेचा नायक वल्ली, हा जोगता परंपरेचा अनुयायी आहे. पुरुष म्हणून जन्मलेला आणि बहुरूपाने स्वतःला स्त्री म्हणून दर्शवणारा हा माणूस आहे. वल्लीला त्याचा खरा पुरुषार्थ उपेक्षित राहीला असल्याची जाणीव होते. शारिरीक हल्ले, सामाजिक हीन वागणूक आणि छळ सहन करावा लागत असल्याने तो वैतागतो. वल्ली परंपरेच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतो. शहरी जीवनात त्याचा तारासोबत एक नवा प्रवास सुरू करतो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी