29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयGopichand Padalkar MLC : देवेंद्र फडणविसांनी गोपीचंद पडळकरांमधील ‘हे’ गुण हेरले

Gopichand Padalkar MLC : देवेंद्र फडणविसांनी गोपीचंद पडळकरांमधील ‘हे’ गुण हेरले

टीम लय भारी

मुंबई : भारतीय जनता पक्षात अनेक मातब्बर नेते आहेत. पण या नेत्यांना डावलून गोपीचंद पडळकरसारख्या ( Gopichand Padalkar MLC ) तरूणाला पक्षाने आमदार बनविल्याबद्दल नकारात्मक चर्चा सुरू आहे. परंतु गोपीचंद पडळकर यांना आमदार बनविण्यामागे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुज्ञपणाची खेळी केली असल्याचे बोलले जात आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देणार असे भाजपने आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन भाजपला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे धनगर समाज भाजपवर नाराज झाला. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने भाजपला मतदान केले नाही.

धनगर समाजामध्ये पक्षाबद्दल पसरत चाललेली नाराजी भाजपला परवडणारी नव्हती. धनगर समाजाला जवळ करायचे असेल तर धाडसी निर्णय घेण्याची गरज होती. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देणे भाजपला आता तरी शक्य नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये ताकद असलेल्या नेत्याला जवळ करणे हाच एकमेव पर्याय भाजपसमोर होता.

Gopichand Padalkar MLC
गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशातच आमदारकीची शपथ घेतली

सध्या गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) हाच धनगर समाजामध्ये लोकप्रिय असलेला एकमेव नेता आहे. महादेव जानकर यांची धनगर समाजात मोठी लोकप्रियता होती. पण जानकर यांनी वादग्रस्त विधाने केली. धनगर समाजावरच जानकर यांनी उलट सूलट आरोप केले. त्यामुळे धनगर समाज जानकरांवर कमालीचा नाराज झाला.

सध्यस्थितीत जानकरांच्या मागे पूर्वीसारखी धनगरांची ताकद उरलेली नाही. राम शिंदे हे भाजपमधील दुसरे खमके नेते आहेत. पण राम शिंदे यांनी स्वतःला धनगर नेता म्हणून कधी प्रोजेक्ट केले नाही. धनगर समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी कधीही लढे दिले नाहीत.

धनगरांना कुणीच वाली उरला नसल्याची स्थिती झाली असताना गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) यांनी धनगरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. सन २०१८ व २०१९ या दोन वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये झंझावती वातावरण तयार केले.

Gopichand Padlkar MLC
विधानभवनातील पडळकर यांच्या एंट्रीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले

धनगरांच्या प्रश्नासाठी त्यांनी भाजपवर सुद्धा टीका केली. आरक्षणाची जोरदार मागणी लावून धरली. मुळातच पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) यांना प्रभावी वर्क्तृत्व शैलीची दैवी देणगी लाभली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत त्यांनी राज्यभरात जोरदार सभा घेतल्या. या सभांना ५० हजार, १ लाख असा समुदाय असायचा.

पडळकर यांची सोशल मीडियातील लोकप्रियताही शिगेला पोचली. फेसबुक व वॉट्सअपवर पडळकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे जाहीर सभा व सोशल मीडियाच्या माध्यमातून पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत बनले. धनगर समाजाबरोबरच त्यांनी इतर अठरापगड जातीच्या समुहांनाही जवळ केले.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर ते २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमधून बाहेर पडले. सांगली मतदारसंघात त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर भाजपच्याच संजयकाका पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यांचा पराभव झाला, परंतु तीन लाखांपेक्षा जास्त मते घेऊन त्यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली.

गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) यांच्या या झंझावातामुळे त्यांची धनगर व बहुजन समाजातील लोकप्रियता वाढली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये सन्मानाने परत घेतले. अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधून निवडणूक लढविण्यास भाग पाडले.

Gopichand Padalkar MLC

गोपीचंद पडळकर यांची खानापूर – आटपाडी मतदारसंघात मोठी ताकद आहे. तेथून ते सहजपणे निवडून आले असते. परंतु देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहास्तव त्यांनी बारामतीच्या बिनभरवशाच्या जागेवर निवडणूक लढविली.

गोपीचंद पडळकर यांनी धनगर व बहुजन समाजामध्ये तयार केलेली ताकद भाजपकडे वळवायची असेल तर त्यांना आमदार करणे गरजेचे आहे हे फडणवीस यांनी हेरले. राजकीय सूज्ञपणा दाखवत फडणवीस यांनी पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) यांना आमदार बनविले.

Rane Vs Pawar

पडळकर यांना हाताशी धरून धनगर व बहुजनांमध्ये भाजपचे वर्चस्व तयार करणे शक्य आहे. जाहीर सभा गाजविण्यामध्ये पडळकर माहीर आहेत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी पडळकरांना ( Gopichand Padalkar MLC ) आमदारकी दिल्याचे बोलले जात आहे.

शपथविधीदरम्यान पडळकरांचा धनगरी बाणा

आपल्या निष्ठा धनगर व बहुजन समाजाप्रती असल्याचे पडळकर ( Gopichand Padalkar MLC ) यांनी आज आमदारकीची शपथ घेते वेळी दाखवून दिले. ते धनगरी वेशातच विधानभवनात दाखल झाले.

त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही धनगर, मुस्लीम, साळी, कोळी, रामोशी, वाणी अशा सगळ्या अठरा पगड जातींचा उल्लेख केला. या जातींचा प्रतिनिधी म्हणून मी विधीमंडळात जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील ठरताहेत धनगर समाजाचे खलनायक

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

Mumbai: Gopichand Padalkar reconciles with BJP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी