33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रGopinath Munde death Anniversary : गोपीनाथ मुंडे पोळी – रस खाऊन गेले,...

Gopinath Munde death Anniversary : गोपीनाथ मुंडे पोळी – रस खाऊन गेले, अन् परत आलेच नाहीत, पंकजाताईंनी जागवल्या आठवणी

टीम लय भारी

बीड :  बाबा ( कै. गोपीनाथ मुंडे )  २ जून रोजी घरी पोटभर रस – पोळी खाऊन गेले होते. स्वतःच्या घरी त्यांचं ते अखेरचं जेवण. ३ जून रोजी त्यांचे पार्थिव देखील घरी आणता आले नाही. त्यामुळे ३ जून हा दिवस उजाडूच नये वाटत असल्याच्या भावना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत ( Pankaja Munde express her emotions about Gopinath Munde ).

येत्या 3 जून रोजी कै. मुंडे यांची पुण्यतिथी आहे. गोपीनाथ गडावर ही पुण्यतिथी साजरी होणार आहे ( Gopinath Munde death anniversary on 3rd June). परंतु या पुण्यतिथी सोहळ्यासाठी कै. मुंडे यांच्या चाहत्यांनी बिल्कूल उपस्थित राहू नये. सगळ्यांनी ‘लॉकडाऊन’चे पालन करावे, असे आवाहन पंकजाताईंनी केले आहे.

लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन  त्यांनी केले आहे.

Gopinath Munde death anniversary

कै. मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे ( Followers of Gopinath Munde must be stay at home ).

 कै. मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस 3 जून रोजी आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी ( Gopinath Munde death anniversary amid Lockdown 5.0 ) कार्यक्रम होणार आहे.

पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये, असा संदेश पंकजाताई मुंडे यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

VIDEO : पंकजा मुंडेंनी ‘करोना’पासून खबरदारी घेण्यासाठी जनतेला केले आवाहन

पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव

पुण्यतिथीला हे कराल ना…

चाहत्यांनी ३ जून रोजी आपापल्या घरात मुंडे साहेबांच्या फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. आजी, सून, नात उजवीकडे तर आजोबा, मुलगा,नातू डावीकडे असे उभे राहून दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा.

Gopinath Munde death Anniversary : गोपीनाथ मुंडे पोळी – रस खाऊन गेले, अन् परत आलेच नाहीत, पंकजाताईंनी जागवल्या आठवणी

मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे     असेही आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला जपा, गर्दी करू नका, घरात रहा, तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे. कराल ना मग एवढं ? मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी असे पंकजाताईंनी म्हटले आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी