27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयAnil Gote scathing on Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कपटी, नीच, दगलबाज,...

Anil Gote scathing on Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कपटी, नीच, दगलबाज, हृदयशून्य व्यक्ती

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणारा लेख लिहिला होता. या लेखाचा प्रतिवाद करणारा दुसरा लेख भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी लिहिला ( Anil Gote scathing on Devendra Fadnavis ) आहे.

( सदाभाऊ खोत यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा )

हाराष्ट्रातील सर्व सरंजामदार आज देवेंद्र फडवणीसांच्या नेतृत्वाखालील आणि सदाभाऊ खोतांच्या भारतीय जनता पक्षातच आहेत. सदाभाऊ खोतांचा अभ्यास कमी पडतो व विस्मरणशक्ती वाढली हे कळत नाही. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापुरच्या गादीचे वारस खासदार संभाजीराजे भोसले व शरद पवारांचे एकेकाळचे खंदे समर्थक विजयसिंह मोहिते पाटील सहकुटूंब सह परिवार आप्त मित्रांसह आजमितीस कुठल्या पक्षात आहेत ? याचा खुलासा सदाभाऊंनी केला असता तर, बरे झाले असते.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी  देवेंद्र फडवणीसांनी स्वागतपर केलेल्या भाषणात वापरलेले वाक्य सदाभाऊ खोतांनी पुन्हा एकदा नजरेखालुन घालावे. ‘महाराष्ट्रातील मराठ्यांची ( सरंजामदारांची ) सर्व घराणी आज भाजपात आहेत. त्यांच्याकडे राहील कोण ?’  असे वक्तव्य केले होते. देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व केवळ बहुआयामीच नव्हे तर, बहुगुणी तसेच सर्वगुण संपन्न आहे.

सन १९८० च्या नाशिक आंदोलनात सदाभाऊ खोत या नावाची कुणीही व्यक्ती नव्हती ( Anil Gote alleged that, Sadabhau khot hadn’t involved in 1980’s farmers agitation). त्यामुळे त्यांना कुठल्या आंदोलनाची आणि आरोपाची आठवण झाली हे लक्षात येत नाही. त्यांच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करणे अथवा त्यांना इतिहासातील सत्य घटनांची जाणीव करुन देणे या घटनांचा साक्षीदार म्हणून आवश्यक व अपर्यायी आहे.

चाकणला शरद जोशींनी कांद्याचे आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या अभिनव व पहिल्या आंदोलनाचे लोण वाऱ्याच्या वेगाने राज्यभरात पसरले. ज्या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या भागापुरते कांदा आंदोलन मर्यादीत होते. मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, धुळे , साक्री इत्यादी.

देवेंद्र फडणवीसांची शरद जोशींशी तुलना होऊ शकत नाही

कांदा उत्पादन क्षेत्रात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. माधवराव खंडेराव मोरे यांच्या नेतृत्वाखालील पिंपळगाव बसवंत येथे कांदा आंदोलन झाले. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला. कांदा आंदोलनात माधवराव खंडेराव मोरे यांना SRP ने इतकी मारहाण केली की, त्यांना ऐका कानाने ऐकु येण्याचे कायमचे बंद झाले.

लढाऊ शेतकरी नेते माधवराव मोरेंना शेतकरी संघटने पासून दुर का व्हावे लागले हा इतिहास फार कटू व क्लेशदायक आहे. कधीतरी शेतकरी संघटनेतील या विषयावर मी लिहिणार आहे.

त्या काळात ऊसाचा दर १८० रुपये टन होता. आम्ही ३०० रुपये टन मागत होतो. मुख्यमंत्री बॅरीस्टर अब्दुल रेहमाण अंतुले व माजी मुख्यमंत्री शरद पवारांचे संबंध टोकाचे ताणलेले होते. शरद पवारांना आवर घालायचा असेल तर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील असे अतुंलेना पटवून देण्यात यश आले.

हे सुद्धा वाचा

Politics : देवेंद्र फडणवीस खोटारडे, आभासी आकडे दाखवून केली दिशाभूल

Coronavirus : देवेंद्र फडणवीस यांना रेशनिंगचे लाभार्थी व्हायचे आहे का ? : काँग्रेसने फटकारले

Devendra Fadanvis : फडणवीसजी, आपण इतके कसे महाराष्ट्रद्वेषी ?

वाटाघाटीतून २०० रु. टन पहिले ॲडव्हान्स पेमेंट करावे असे ठरले. अर्थात हंगाम संपल्यानंतर ऊसाचे   फायनल पेमेंट अर्थातच ३०० रु. टनावर गेले. सदाभाऊ खोतांना निश्चितच माहित नाही की, या सर्व आंदोलनाच्या मागे साखर महासंघाचे अध्यक्ष माधवराव बोरस्ते होते. सदाभाऊ खोत ज्यांच्या नावाने आज खडे फोडत आहेत. बोटे मोडत आहे. शिव्या शाप देत आहेत त्या साखर काराखांनदारांनी टनामागे चार आण्यांपासुन एक रुपयांपर्यत वर्गणी काढून शेतकरी संघटनेला आर्थिक ताकद दिली. अर्थात याचे सर्व श्रेय साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. माधवराव बोरस्ते, माधवराव खंडेराव मोरे, रामचंद्र बापु पाटील, प्रल्हाद कऱ्हाड पाटील इ. नेत्यांना जाते.

‘बामणाला शेतीतलं काय कळत ?’  असे जातीयवादी वाक्य अब्दुल रेहमान अंतुले यांच्या मंत्री मंडळातील महसूल मंत्री सौ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांनी सटाणे तालुक्यातील एका समारंभात उच्चारले होते.

सहकारातील वतनदारी नष्ट करण्याकरता शरद जोशींनी जेवढे प्रयत्न केले त्या तुलनेत फडणवीसांनी केलेले काम शून्य आहे ( Anil Gote says, Devendra Fadnavis’ work compare to Sharad Joshi is zero). मी संघटना सोडली. संघटनेतून बाहेर पडलो. याचा अर्थ शरद जोशींचे विचार सोडले असा होत नाही.

शरद जोशींनी साखर कारखानदाराला शेतकरी संघटनेत येऊ देण्याचे कटाक्षाने टाळले. उलट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या निवडणुका लढवून कारखाने ताब्यात घ्यावे यासाठी जीवाचे रान केले. गिरणा सहकारी साखर कारखाना शेतकरी संघटनेने ताब्यातही घेतला. कै. नरेंद्र आहिरे यांना चेअरमन केले. पण साखर कारखाना यशस्वीरीत्या चालवु शकलो नाही. ही वस्तुस्थिती नाकारण्यात काही अर्थ नाही.

एका साखर कारखान्याची सत्ता हाती आल्यानंतर शेतकरी संघटनेत गटातटाचे, हेव्या दाव्याचे राजकारण सुरु झाले. वसंतदादा सहकारी साखर कारखाना कै. शांताराम आहेर संघटनेच्या नेत्यांनी ताब्यात घेतला. नंतर जे घडले ते सर्वश्रृत आहे.

आजही सांगतो की, शरद जोशी आणि शेतकरी संघटना या वियषयाला सदाभाऊ खोतांनी हात घातला नसता तर, त्यांना उत्तर देणारे लिखाण करण्याचा खटाटोप केला नसता. परंतु कुणाचाही अकारण गैरसमज होऊ देऊ नये. तसेच चुकीच्या गोष्टीचे समर्थन करण्याचा माझा स्वभाव नाही. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी तर अजिबात नाही.

मराठा व धनगरांची आरक्षणावरून फसवणूक

मराठा आणि धनगर आरक्षणाबद्दल सदाभाऊंनी मांडलेली मते अपरीपक्व व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहेत. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी त्यांना पुरेसी माहिती नाही हे दुर्दैव !  काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असतांना नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाची भुमिका मांडली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपुर्वीच मराठा आरक्षणाचा जी.आर काढुन मोकळे झाले.

‘धनगरांना आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी भुमिका कै. गोपीनाथ ( Anil Gote says, Gopinath Munde was stand behind Dhangar reservation ) मुंडे साहेबांची होती. पंढरपूर ते बारामती पदयात्रेच्या समारोपावेळी बारामतीला धनगर समाजाचे नेते आमरण उपोषणाला बसले होते. स्वत: देवेंद्र फडणवीस, सौ. पंकजाताई मुंडे इत्यादी नेते हेलिकॉप्टरने उपोषण स्थळी आले. ‘भाजपची सत्ता येताच मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगरांच्या आरक्षणाचा ठराव करु’ असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी स्वत: दिले.

पण मी तुमच्या सारखे जातीयवादी बोलणार नाही. असेही म्हणणार नाही की, भटाने धनगरांना फसवले. असे जातीयवादी विचार माझ्या मनात कधी आले नाहीत. जात अथवा धर्म अपघाताने मिळतो. कुठलाही हिंदु जन्मापुर्वी परमेश्वराला लोणी लावून मला हिंदुच्या घरात जन्म मिळाला पाहिजे अशी आराधना करीत नाही. अथवा कुणी मुस्लीम “अल्लाताला दुनिया इधरकी उधर हो जाये लेकीन मुझे मुस्लमान के घर में ही पैदा कर ” अशी विनवणी  केली नाही.

असे असते तर मी परमेश्वराशी भांडण करुन सरळ इंदिरा गांधींच्याच पोटी जन्माला आलो असतो. म्हणजे भानगड नको. जात धर्म हे जन्माच्या अपघाताने मिळतात. त्याचे निवडस्वातंत्र्य जगाच्या पाटीवर कुणालाही नाही. या पार्श्वभुमीवर कुठल्या तरी एका जातीला लक्ष करुन ठोकून काढायचे हे संयुक्तिक वाटत नाही.

देवेंद्र फडणवीस विश्वासघातकी

देवेंद्र फडणवीसांनी माझा विश्वासघात केला. फसवणूक केली. १००० टक्के खोटे बोलले. माझे राजकीय जीवन उध्दवस्त करण्याकरता कष्टाचे किमान २५ ते ३० कोटी तरी खर्च केले. त्यांच्याशी वाद होण्यापुर्वी संघटन मंत्री विजय पुराणीक, मी व देवेंद्र फडणवीस रात्री १० ते १.३० वाजे पर्यंत एकत्र चर्चा केली.

दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत त्यांनी पालिका निवडणुका अनिल गोटेंच्याच नेतृत्वाखाली होतील अशी घोषणा केली. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता ‘अनिल गोटे साहेब आपलं ठरल्याप्रमाणे होईल. तुम्हाला AB फॉर्म मिळतील’ अशा मी सर्व सुचना दिल्या आहेत, असे रेटून सांगितले.

खोटे बोला पण रेटून बोला असे धोरण भाजपने गेल्या ५ – ६ वर्षात स्वीकारले आहे. देवेंद्र फडणवीस हा माणुस दगलबाज, खोटारडा, विश्वासघातकी आहे ( Anil Gote alleged that, Devendra Fadnavis is liar, insidious, betrayer ). त्यांनी आधीच AB  फॉर्म धुळ्याला पोहोचवले होते. सदाभाऊ, देश पातळीवरील खुप नेत्यांशी माझे सलोख्याचे संबंध होते. काही नेत्यांशी आजही आहेत. पण देवेंद्र फडणवीसांएवढा कपटी, नीच, हलकट, ह्रदयशून्य, दगलबाज नेता मला आयुष्यात दुसरा कुणी भेटला नाही. कदाचित तुमच्या भावना दुखावल्या असतील. आज देवेंद्र आपणाला परमेश्वरा समान आहेत. कालांतराने आपणास अनुभव येईलच.

दुध उत्पादन, म्हशी, गायी, चिलिंग प्लान्ट दुधाचे भाव त्यातील अर्थकारणात मी आपणाएवढा अभ्यासु व अनुभवी मुळीच नाही. तज्ज्ञ तर नाहीच नाही. आमच्या भागातील प्रामुख्याने साक्री तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली सुरू केलेला दुध उत्पादक उद्योग का फसला ? त्याचे दिवाळे का निघाले ? आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील बँकाचे बोजे का उतरले नाहीत ? आपण एक आदर्श निर्माण करण्याकरता उभा केलेला प्रकल्प का बुडाला ? ( Anil Gote on Sadabhu Khot ).

आपण देवेंद्र फडणवीस या अतिशय पापभिरु, सज्जन, निष्पाप, प्रमाणिक तसेच शब्दाला जागणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याकरीता विरोधकांनी सोशल मीडियात मलई पेरुन ट्रोलिंग करण्यासाठी टोळके निर्माण केले आहे असे अतिशय धाडसी वक्तव्य आपण केले.

राहुल गांधींबद्दल रोज चित्र विचित्र ब्लॉग लिहुन त्यांना पप्पु ठरवण्याचे काम ठरविण्यामागे कोण राजकीय साधु संत होते ? याचाही खुलासा व्हावा. त्याच बरोबर आपण  ‘एकाच मंचावर या’ असे आव्हान दिले. मी तुमचे आवाहन स्वीकारले आहे. आपण केव्हाही कळवा माझी तयारी आहे.

धनगराच्या आरक्षणाबद्दल केवळ देवेंद्र फडणवीसच बोलले होते असे नाही तर बारामती आणि सोलापुर येथील प्रचार सभांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही बोलले होते. गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांचा घोषा होता की, आदीवासींच्या आरक्षणाला धक्का न लागु देता आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ.   पण धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात टांगुन ठेवायचा. मराठ्यांना लटकुन ठेवायचे. मराठ्यांची एक गठ्ठा मते लुंगवायची, मग धनगरांच्या मतांची गरजच काय ?

महाराष्ट्रात राम शिंदे आणि मी स्वत: ( माझी स्वत:ची आरक्षणाबद्दलची मते फार वेगळी आहेत) आम्हा दोन्ही धनगर नेत्यांचा बेमालुमपणे काटा काढला. लोकाधार असलेल्या धनगरांबरोबर पक्षातील अन्य सर्व नेते टप्याटप्याने संपवले. यातूनच धनगर समाजाच्या नेतृत्वाला सुध्दा कोलवुन लावायचे असे कारस्थान रचून बेमालुमपणे ते पार पाडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी