33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

टीम लय भारी:

पुणेः प्राध्यापक हरि नरके पुण्यातील कोथरुड भागात राहतात. गेली 28 वर्षे ते पुण्यात राहत आहेत. त्यांच्या इमारतीचे पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. त्यामुळे संबंधीत बिल्डरने त्यांना राहण्यासाठी एक फ्लॅट दिला आहे. त्याच मजल्यावर दुसरा फ्लॅट घेण्यासाठी एक जण आला. त्यांना तो पसंत पडला. त्यांनी ओळखीच्यांकडे चैकशी केली. तर त्यांना असे सांगण्यात आले की, तो फ्लॅट घेऊ नका. त्या समोरच्या खोलीत राहणारे हरि नरके खालच्या जातीचे आहेत. त्यांच्या हाॅलमध्ये फुले, आंबेडकरांचे फोटो आहेत. आपण उच्च जातीय, पेशवे कुलीन, आपल्या जातवाल्यांच्या मजल्यावर फ्लॅट घ्या.

पुरोगामी महाराष्ट्रात म्हणजेच, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अजूनही जातीयतेचे ग्रहण लागले आहे. ज्या पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी जातीयतेवर आवाज उठवला. सनातनी मंडळींनी त्यांना सुखाने जगू दिले नाही. त्याच पुण्यातील जातीयतेची मुळे अजून नष्ट झालेली नाहीत. हेच या घटनेवरुन अधोरेखीत झाले आहे. ‘जात जात नाही ती जात‘ या जातीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. यावर प्राध्यापक हरि नरके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुध्दा वाचा:

  आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार सोनिया गांधीच्या शेजारी

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंच्या घराचा परिसर झाला ‘चकाचक

एकनाथ शिंदेनी फडणवीसांचे मुख्यमंत्री पद हिसकावले; आता गृहखात्यावर डोळा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी