30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील यांनी सीबीआय धाडीचा नोंदविला निषेध

जयंत पाटील यांनी सीबीआय धाडीचा नोंदविला निषेध

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले (Fully co-operated with the CBI inquiry). उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते.

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाकडून प्राथमिक चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. या माध्यमातून सीबीआय अनिल देशमुख  यांची बदनामी करून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. (NCP leader Jayant Patil slams CBI after raids on Anil Deshmukh house)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले (Fully co-operated with the CBI inquiry). याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला (Jayant Patil tried to draw attention).

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल!

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

CBI books former Maharashtra minister Anil Deshmukh, searches his home in Mumbai

अँटिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे,  असे जयंत पाटील यांनी म्हटले (Jayant Patil said that the CBI seems to be achieving political objectives by taking bold steps).

अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट घालून झाडाझडती; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

तब्बल 100  कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचे वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे.

पीपीई किट्स घालून सीबीआयचे अधिकारी छापेमारी करत आहेत. यावेळी एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्याही सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात दिसत आहेत. त्यामुळे या बॅग आणि पिशव्यांमध्ये नक्की काय आहे? याचे गूढ वाढले आहे.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी