33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यकाळवंडलेले गुडघे, कोपरांमुळे अनकंफर्टेबल वाटते; घरगुती उपायांमुळे दिसेल फरक

काळवंडलेले गुडघे, कोपरांमुळे अनकंफर्टेबल वाटते; घरगुती उपायांमुळे दिसेल फरक

आपल्या त्वचेचा रंग उजळ, नितळ असतो, मात्र गुडघे, हाताचे कोपर, मान काळवंडलेली असल्याने काहीजण त्रस्त असतात. त्यामुळे कधीकधी चारचौघात अनकंफर्टेबल देखील वाटते. त्यामुळे कपड्यांनी आपण आपली काळवंडलेली त्वचा झाकण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही घरगुती उपाय करुन देखील तुम्हाला त्वचेचा काळवंडलेपणा दुर करता येऊ शकतो. आणि आत्मविश्वासाने आपण वावरु शकतो.

1) लिंबू आणि बेसन
लिंबू आणि बेसन पीठाची पेस्ट देखील तुम्ही काळवंडलेली त्वचा दुर करण्यासाठी वापरु शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यात सॅट्रीक अॅसिड देखील असते. त्यामुळे ते त्वचेसाठी लाभदायी ठरु शकते. लिंबूचा रस आणि बेसन पिठाची पेस्ट काळवंडलेल्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल.

2) शुद्ध खोबरेल तेल आणि अक्रोड
शुद्ध खोबरेल तेल आणि अक्रोडची पावडर एकत्र मिसळून ती काळवंडलेल्या त्वचेवर लावल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. खोबरेल तेल हे त्वचेच्या मॉइस्चरायझिंग चांगले समजले जाते. या तेलात व्हिटॅमिन ई असते. तर अक्रोडच्या पावडरमुळे त्वचेचा काळसरपणा दूर होण्यास मदत होते. अंघोळ करताना हे स्क्रब तुम्ही वापरू शकता. अंघोळी नंतर हलक्या हाताने त्वचेवर खोबरेल तेल लावा.

3) दुध आणि बेकिंग सोडा
काळवंडलेल्या त्वचेसाठी बेकिंग सोडा आणि दुधाचे मिश्रण वापरू शकता. बेकिंग सोड्यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यास मदत होते. तर दुध त्वचेच्या मॉइस्चरायझिंगसाठी मदत करते. या दोन्ही घटकांचा एकत्र करुन एक दिवसाआड काळवंडलेल्या त्वचेवर वापरु शकता, त्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल.

4) कोरफड
कोरफड ही त्वचा, केस, पचनसंस्था आदी विविध समस्यांसाठी उपयोगी समजली जाते. कोरफडीला बहुगुणी असे समजले जाते. स्त्रीयांसाठी तर कोरफड अत्यंत उपयुक्त आहे. काळवंडलेली त्वचा दुर करण्यासाठी देखील कोरफडीचा वापर करु शकता. कोरफडीच्या पानांचा गर कांळवंडलेल्या त्वचेवर लावून मसाज केल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल.

5) प्युमिक स्टोन
शरीरावरील मृत त्वचा काढण्यासाठी प्युमिक स्टोनचा वापर करु शकता. प्युमिक स्टोनने तुम्ही तुमची त्वचा साफ करु शकता. काळवंडलेली त्वचा दुर करण्यासाठी कोपर, गुडघ्यांना अंघोळ करताना प्युमिक स्टोनने घासा त्यामुळे काळवंडलेली त्वचा दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल.

6) दही आणि हळदीचा वापर
काळवंडलेली त्वचा दूर करण्यासाठी दही आणि हळदीची पावडरचा उपयोग करु शकता. त्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. दही त्वचेसाठी मॉइस्चरायझर आहे, तर हळद त्वचेतील दुषितपणा दुर करते, आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते. हळद पावडर आणि दह्याची पेस्ट करुन काळवंडलेल्या त्वचेवर वापरल्यास त्याचा तुम्हाला लाभ होईल.

व्यक्तीच्या आरोग्यानुसार त्वचेच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे घरगुती उपचार घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही देखील तुम्ही असे उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेच सुचवितो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी