31 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमनोरंजनअमीरची मुलगी होणार मराठमोळी सून; पुढील वर्षांत 'या' दिवशी वाजणार सनई चौघडे!

अमीरची मुलगी होणार मराठमोळी सून; पुढील वर्षांत ‘या’ दिवशी वाजणार सनई चौघडे!

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त चर्चेत असते. इरा आपल्या प्रियकर नुपूर शिखरे सोबत पुढील वर्षात जानेवारीत विवाहबद्ध होणार आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इरा आणि नुपूर यांचा साखरपुडा झाला होता. एरवी प्रसार माध्यमांपासून लांब राहणाऱ्या इरानं स्वतःहूनच समोर येत आपण जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याचं सांगितलं.

इराचा मराठमोळा प्रियकर नुपूर शिखरे फिटनेस ट्रेनर आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे इरा नैराश्यतेच्या गर्तेत अडकली होती. पहिल्या नातेसंबंधात अपयश मिळाल्यानं इरा पूर्णपणे खचली होती. या काळातच इराची आणि नुपूरची मैत्री झाली. नुपूरनंच आपल्याला नैराश्यतेच्या गर्तेतून बाहेर काढल्याचं इरा सांगते. या मैत्रीचा प्रेमात कधी रूपांतर झालं आम्हां दोघांनाही समजलं नाही. दोघांना एकमेकांबद्दल खात्री पडल्यानंतर मी तातडीनं घरी नुपूर बद्दल सांगितलं, असं इरा म्हणाली.

येत्या जानेवारी महिन्यात राजस्थान येथील उदयपूर येथे दोघंही विवाहबद्ध होतील. 3 जानेवारी रोजी दोघांचं लग्न होईल. इरा मुस्लिम तर नुपूर मराठी आहे. लग्न कोणत्या पद्धतीत होईल याबाबत इराने माहिती नाही दिली. तीन दिवस लग्न सोहळा सुरू राहील.

दरम्यान,बऱ्याच काळापासून ब्रेकवर असलेल्या अमीर खानने आता पुन्हा चित्रपटाच्या तयारीसाठी हालचाली सूरु केल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता आमिर खाननं आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. आता आमिर खान नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात करेल.

हे ही वाचा 

वेलकम 3 मधून बाहेर काढल्यानं नाना पाटेकर वैतागले! काय म्हणाले वाचा..

इंस्टाग्रामवर नयनताराला मिळाले पाच लाख फॉलोवर्स

साडी असो की वेस्टर्न आऊटफिट; माधवी निमकरचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क !

सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन चालू आहे. चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटाचं नाव अद्यापही ठरलेले नाही. आमीर खान शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात करीना कपूर खान सोबत दिसला होता. हा चित्रपट फारसा चालला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी