28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeआरोग्यCovid2019 : कोरोना काव्य

Covid2019 : कोरोना काव्य

माणसा….माणसा…. आता तरी जागा हो…. ( Covid2019 )

उंच उंच बांधलेस इमले
पैसे पण भरपूर जमले
देशासाठी मात्र काहीच नाही केले
क्रांती चा या धागा हो
माणसा….माणसा…. आता तरी जागा हो….

प्राणी मारलेस, पक्षी मारले
घरटे त्यांचे उध्वस्त करून सिमेंटचे जंगल उभे केले
स्वार्थासाठी वाट्टेल ते केले
एकदा तरी या सुंदर निसर्गाचा भाग हो
माणसा….माणसा…. आता तरी जागा हो….

संकट काळी नवस केले
हजारो किलोमीटर जाऊन देव देव केले
देवाला पण तू ब्लॅकमेल केले
अरे निसर्ग हाच देव आहे तू फक्त त्याचा मित्र हो
माणसा….माणसा…. आता तरी जागा हो….

पूर आले आणि गेले
भूकंप आले आणि गेले
रोग आले आणि ते पण गेले
तू फकत त्यावर जोक्स आणि मेम्स केले
यातून वेळ मिळाला तर संकटकाळी मदतीचा हात हो
माणसा….माणसा…. आता तरी जागा हो….

न दिसणारा विषाणू त्याने तुला
सळो-की-पळो केले
तुझे आयुष्य मात्र दुसऱ्याला
संपवण्यात गेले
बुद्धिमान प्राणी तू त्याचे महत्त्व तुला कधीच नाही कळले
या बुद्धीचा अहंकार बाजूला ठेवून
निसर्गाच्या संवर्धनासाठी एकजुटीचा धागा हो
माणसा….माणसा…. आता तरी जागा हो….
माणसा….माणसा…. आतातरी जागा हो….
अरे आता तरी जागा हो रे….

© अमोल कणसे

 

हे सुद्धा वाचा

Covid-19 : राष्ट्रवादीचा नेता ब्रिटनमध्ये, अडकलेल्या भारतीयांना करतोय मदत

Lockdown21 : ‘बेस्ट’चा अजब कारभार, बिनकामाच्या प्रवाशांसाठी बसेस; कर्मचाऱ्यांना काम नसतानाही उपस्थितीची सक्ती

कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय माहिती

केंद्र सरकारची कोरानाबद्दलची जनजागृती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी